Solapur News: मित्राच्या मृत्यूचा धक्का, अंत्यसंस्कार सुरु असतानाच जिगरी दोस्ताचा शेवट; सोलापूर हळहळलं!

एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर

Solapur News: मित्राने आत्महत्या केल्यानंतर विरह सहन न झाल्याने दुसऱ्या मित्रानेही आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. अवघ्या काही तासात दोन जिवलग मित्रांनी आत्महत्या केल्याने अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.  गोरख भोई आणि सुरेश भोई असे आत्महत्या केलेल्या जिवलग मित्रांची नावे आहेत. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घ्या..

जिवलग मित्रांची आत्महत्या, सोलापूरात खळबळ

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यात एका मित्राने आत्महत्या केल्यानंतर दुसऱ्या मित्राला दुःख सहन न झाल्यामुळे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. गोरख भोई आणि सुरेश भोई अशी या जिवलग मित्रांची नावे आहेत. 

Shocking CCTV: पुणेकरांनो, सतर्क रहा, काळजी घ्या! 'तो' औंधमध्ये आलाय, पाहा धक्कादायक VIDEO

प्रथम गोरख भोई या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. मित्राच्या आत्महत्येचा सुरेशला जबरदस्त धक्का बसला. त्याला मित्र विरह सहन न झाल्याने गोरख भोई याचा अंत्यविधी सुरू असतानाच सुरेश भोई यानेही आपले आयुष्य संपवले. सुरेश भोई याने शेतात जाऊन झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. 

गोरख आणि सुरेश दोघेही जिवलग मित्र होते. सुरेश भोई याचे आई-वडील शेतात शेतमजूर म्हणून काम करतात. सुरेश आणि गोरखच्या मैत्रीची चर्चा असायची.  दोघे जाईल तिकडे सोबत फिरायचे. अशातच एकाच दिवशी दोन जिवलग मित्रांचा असा दुर्दैवी शेवट झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी दक्षिण सोलापुरातील मंद्रूप पोलीस ठाण्यात दुर्दैवी घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Advertisement

Pune Crime: शरद मोहोळ ते आंदेकर.. पुण्याच्या रक्तरंजित गुन्ह्याचे MP कनेक्शन! एक गाव 3 राज्यात धमाके


 

Topics mentioned in this article