सोलापूर जिल्हा बँक प्रकरणात मोठी कारवाई! विजयसिंह मोहिते पाटलांसह दिग्गजांना दणका; वसुलीचे आदेश निघाले

विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी हे आदेश जारी केले असून माजी उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

 सौरभ वाघमारे, सोलापूर:  सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. 238 कोटींच्या बेयकादेशीर कर्ज वाटप प्रकरणात जबाबदार धरलेल्या तत्कालीन संचालक मंडळासह बँकेचे दोन अधिकारी, एका चार्टड अकाउंटटकडून वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी हे आदेश जारी केले असून माजी उपमुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, 2010 साली सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीर कर्ज वाटप प्रकरणात गैरप्रकार झाल्याची तक्रार राजेंद्र राऊत यांनी केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर कलम 83 आणि 88 नुसार चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत संचालक मंडळाने नियमबाह्य पद्धतीने कर्ज वाटप केल्याचे स्पष्ट झाले होते.

नक्की वाचा: प्रेमविवाह, वाद अन् भयंकर शेवट! पत्नीने नवऱ्याला संपवलं; हत्येनंतर पोलिसांना फोन केला अन्

 संचालक मंडळाच्या सदस्यांनी स्वतःच्या संस्थांना कर्ज घेतले मात्र त्या कर्जाची परतफेड केली नसल्याने बँक अडचणीत आल्याचा ठपका या चौकशी अहवालात ठेवण्यात आला होता. या चौकशी अहवालनंतर आता विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनी कलम 98 अन्वये जबाबदार धरण्यात आलेल्या संचालक मंडळाकडून वसुली करण्याचे आदेश दिलेत.

दरम्यान,  या आदेशामुळे बँकेचे तत्कालीन संचालक मंडळाचे सदस्य दिलीप सोपल, विजयसिंह मोहिते पाटील, दीपक आबा साळुंखे, राजन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, दिलीप माने, बबनदादा शिंदे, संजय शिंदे, रश्मी बागल यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्गज नेत्यांना मोठा दणका बसला आहे.  

महत्त्वाची बातमी: विधीमंडळाचं 3 दिवसाचं विशेष अधिवेशन, कसं असेल कामकाज?

Topics mentioned in this article