जाहिरात

विधीमंडळाचं 3 दिवसाचं विशेष अधिवेशन, कसं असेल कामकाज?

या अधिवेशनात मंत्र्यांचा परिचय, नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे.

विधीमंडळाचं 3 दिवसाचं विशेष अधिवेशन, कसं असेल कामकाज?
मुंबई:

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात आलं आहे. फडणवीस सरकारचं पहिलं विशेष अधिवेशन शनिवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात मंत्र्यांचा परिचय, नवनिर्वाचीत आमदारांचा शपथविधी, विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. शिवाय राज्यपालांचे अभिभाषण ही याच अधिवेशनात होईल. हे विशेष अधिवेशन तिन दिवस चालणार आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई येथे शनिवार,7 डिसेंबर रोजी सकाळी 11  वाजता विधानसभेची बैठक आयोजित केली आहे. अशी  माहिती महाराष्ट्र विधानसभेचे सचिव जितेंद्र भोळे यांनी दिली आहे. याचबरोबर महाराष्ट्र विधानपरिषदेची बैठक सोमवार, दिनांक 9 डिसेंबर,2024 रोजी सायंकाळी 4 वाजता आयोजित केली आहे. विधानमंडळ सचिवालयामार्फत याबाबत कळविण्यात आले आहे.

ट्रेंडिंग बातमी - खातेवाटपावरून महायुतीत ओढाताण? गृहच्या बदल्यात 'हे' खातं देण्याची भाजपची तयारी

शनिवार सकाळी 11 वाजता विधानसभा सुरू होईल. यावेळेस विधानसभा नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल. त्यानंतर  विधानसभा अध्यक्ष निवड कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी ही सभागृह सुरू राहणार आहेत. त्यात नवीन सदस्य आमदार शपथ घेतील. तसंच दुपारी 12 वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत राहील. 

ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंचं मन फडणवीसांनी कस वळवलं? पडद्यामागे काय घडलं? NDTV मराठी Exclusive

सोमवारी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. त्यानंतर नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाईल. सोमवारी सायंकाळ चार वाजता राज्यपालांचे भाषण होईल. त्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात येईल. या विशेष अधिवेशनात भाजपा महायुतीटे आमदार जोरदार शक्ती प्रदर्शन करण्याची शक्यता आहे. सर्व आमदारांचे स्वागत गुलाब देत करण्यात येणार आहे. विधान भवनात सीएम आणि दोन्ही डीसीएम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करतील.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com