Solapur News: डॉ. वळसंगकर मृत्यू प्रकरणात नवा ट्वीस्ट! मुलगा अन् सुनेने काय सांगितलं?

Solapur Dr Shirish Valsangkar Death Case Update: चौकशीतून धक्कादायक माहिती समोर आली असून वळसंगकर यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कलहाचे कारण असल्याची शंका आता उपस्थित होत आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: सोलापुरातील प्रसिद्ध न्युरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव असलेले, सोलापूरमधील प्रसिद्ध डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरीष वळसंगकर यांनी आयुष्य का संपवले याबाबत उलटसुलट चर्चा रंगत आहेत. याप्रकरणी त्यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या मनिषा मुसळे मानेला अटक करण्यात आली आहे. अशातच आता वळसंगकर यांचा मुलगा आणि सुनेच्या जबाबातून नवी माहिती समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही वर्षांपूर्वीच आपल्या हॉस्पिटलचा कारभार मुलगा डॉ. आश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे दिली होती. दुसरीकडे त्यांच्या रुग्णालयाचा संपूर्ण कारभार हा प्रशासकीय अधिकारी म्हणून अटकेत असलेल्या आरोपी मनीषा मुसळे माने यांच्याकडे होता. हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभार यामुळे डॉ.आश्विन आणि डॉ. सोनाली यांच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण वाढलेला होता.

( नक्की वाचा : Vaibhav Suryavanshi : आयपीएलचा इतिहास बदलला, 14 वर्षाच्या मुलानं केलं पदार्पण, पहिल्याच मॅचमध्ये खणखणीत सुरुवात )

त्यामुळेच जानेवारी 2025 मध्ये डॉ. शिरीष वळसंगकर यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र स्वतःकडे घेतली. अशातच प्रशासकीय अधिकारी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात काही आर्थिक गैरव्यवहारच्या तक्रारी डॉ. वळसंगकर यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारींमुळे डॉ. वळसंगकर यांनी मनीषा मुसळे हिचे अधिकार कमी केले होते, असं या प्रकरणाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं. 

याच कारणामुळे मनीषा मुसळे-माने हिने डॉ. वळसंगकर यांच्याशी वाद घातला. शिवाय इमेल लिहीत स्वतः आत्महत्या करण्याची धमकी देखील दिली. शिवाय काही महिन्यांपूर्वी डॉ. वळसंगकर यांच्या कुटुंबियात संपत्तीच्या शेअर्सबद्दल देखील चर्चा झाली होती. त्यानुसार डॉ. शिरीष वळसंगकर यांनी काही महिण्यापुर्वीच संपत्तीचे वाटणी कशी असावी याबाबत सविस्तर शपथपत्र देखील तयार केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Advertisement

Dr. Shirish Valsangkar Death: जिला दिला आधार, तिनेच केला घात, डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येची हादरवणारी INSIDE स्टोरी

दरम्यान, डॉ. वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमधील काही कर्मचाऱ्यांचे देखील जबाब पोलीस नोंदवणार आहेत तर आरोपी मनीषा मुसळे-मानेची देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरु आहे. पोलीस त्यादृष्टीने तपास करत असून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. 

नक्की वाचा - 'आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे, कलमाच्या आधारावर बनला पाकिस्तान', पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाच्या ओठावर आलं सत्य