Solapur Result 2026: सोलापुरात भाजपचा ऐतिहासिक विजय! काँग्रेस भुईसपाट; प्रणिती शिंदेंना धक्का

काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे यांना दे धक्का देऊन लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढलेला दिसून येत आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins

संकेत कुलकर्णी, सोलापूर:

Solapur Municiple Corporation Election Result: सोलापूर महानगरपालिकेमध्ये भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सोलापुरमध्ये भारतीय जनता पक्षाने 102 जागांमध्ये 58 जागांवर विजय मिळवला. तर एमआयएम 4 , काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी 1 जागा जिंकली.  महत्त्वाचे म्हणजे भाजपाने काँग्रेस , शिवसेनासह राष्ट्रवादीला व्हाईटवॉश दिलाय. केवळ एमआयएमने भाजपसमोर आपली ताकद अबाधित ठेवलेली दिसली. भाजपचे आमदार विजयकुमार आणि सुभाष देशमुख नाराज असतानाही नव्या दमाच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापुरात अभूतपूर्व यश मिळवले आहे. सोलापुरातील भाजपचा निकाल म्हणजे दोन्ही देशमुख आमदारांसह , सुशीलकुमार शिंदेना दिलेला हादरा आहे. 

सोलापुरात भाजपचा ऐतिहासिक विजय

सन 2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा केवळ 48 जागांवर होते. याच भाजपाने आता आपकी बार 75 पार असा नारा देत खरा करून दाखवला आहे. महापालिकेतील भाजपच्या विजयामुळे काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि त्यांची कन्या खासदार प्रणिती शिंदे यांना दे धक्का देऊन लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढलेला दिसून येत आहे. 

Maharashtra Election Result LIVE: पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपची लाट! विरोधक भुईसपाट; वाचा अपडेट्स

 सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रारंभिक भाजपचे जुने आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख हे पक्षावर नाराज होते. मात्र भाजपकडून त्यांची नाराजी दूर करत त्यांना सक्रिय करण्यात आले. मात्र या सर्वांमध्ये भाजपच्या अंतर्गत लढाईत देशमुखांना मागे टाकत आमदार देवेंद्र कोठे यांनी मोठी सरशी मारली होती. आणि निकालामध्येही देवेंद्र कोठे यांचा वरचष्मा दिसून आला.

महापालिकेच्या निकालानंतर भाजपने खऱ्या अर्थाने विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्यासारख्या जुन्या नेत्यांना साईडट्रॅक करत पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मदतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्यासारख्या नव्या नेतृत्वाला सोलापुरात मोठी ताकद दिली. त्यामुळे सोलापूरच्या निकालानंतर भाजपने एकाच दगडात थेट सुशीलकुमार शिंदे यांच्यावर तर अप्रत्यक्षरीत्या पक्षातील दोन देशमुखांवरही निशाणा साधला आहे. 

खासदार प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदेंना धक्का

सोलापुरातील भाजपच्या प्रचारामध्ये केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आणि ओवेसी यांनी हजेरी लावली. इतर कुठलेही मोठे नेते सोलापूरला फारसे फिरकलेही नाही. खासदार प्रणिती शिंदे लोकसभेप्रमाणे सोलापुरात मोठा प्रचार करतील असा अंदाज होता. मात्र प्रणिती शिंदे यांचा बार फुसका ठरला. परिणामी भाजपने जोरदार मुसंडी मारली. प्रचारादरम्यान झालेल्या पक्षांतर्गत उड्या , खून प्रकरण , राडे असा साऱ्या घटना मागे पडल्या व भाजपचा विजय झाला.

Advertisement

TMC Election 2026: शिंदेंच्या बालेकिल्ल्यात कुणी मारली बाजी? वाचा विजयी उमेदवारांची यादी

मुस्लिमबहुल भाग असणाऱ्या प्रभागांमध्ये केवळ एमआयएमया पक्षाला मोठा प्रतिसाद मिळाला. उर्वरित काँग्रेस , आणि शिवसेनेला एका आकड्याच्या जागेवर समाधान मानावे लागले. तर शिवसेना ठाकरे गट , राष्ट्रवादी शरद पवार , मनसे आणि वंचित यांना खातेही खोलता आले नाही. त्यामुळे नव्या स्ट्रॅटर्जी , नवे नेतृत्व आणि जयकुमार गोरे यांची सोलापुरातील परफेक्ट इनिंग महापालिकेच्या विजयाची फलश्रुती ठरली.