Solapur News: वाल्मिक कराडचा मुलगाही अडचणीत! मॅनेजरच्या पत्नीने केले गंभीर आरोप; रिव्हॉल्वरचा धाक दाखवून...

वाल्मिक कराडनंतर  त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता असून वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

सोलापूर: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. सध्या खंडणी प्रकरणात सीआयडी कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडचा देशमुख हत्या प्रकरणातही संबंध असल्याचे पुरावे समोर येत आहेत. अशातच आता वाल्मिक कराडनंतर  त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता असून वाल्मिक कराडच्या मुलावर सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याच्यावर त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दोन बल्कर ट्रक, दोन कार, परळीतील प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी मॅनेजरच्या पत्नीने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करण्याची मागणी केली आहे. 

 सुशील वाल्मीक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार यांच्याविरुद्ध ही खाजगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे. मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

AAP MLA Death: खळबळजनक! आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू, अपघात की घातपात? कुटुंबियाचा मोठा दावा

 त्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. मॅनेजरच्या पत्नीने केलेल्या आरोपांवर आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे. आता  सुशील कराडवर केलेल्या आरोपबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

दरम्यान, बीडच्या मस्सजोग येथील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.  एसआयटीच्या तपासात सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती लागला असून सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले वाल्मिक कराडशी दोनदा फोनवरून बोलला समोर आलं आहे. मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी कराडला सुदर्शनने पहिला कॉल केला. घुले आणि कराडचे दुसरे संभाषण सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर झाल्याचंही समोर आले आहे. 

Topics mentioned in this article