Solapur News: रोहित पवारांनी Video कॉल केला, माफी मागायला लावली, पडळकरांच्या कार्यकर्त्याने आपबिती सांगितली

शरणू हांडे याला मारहाण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी त्याची भेट घेतली. यावेळी मारहाण झालेल्या तरुणाने रोहित पवार यांचेही नाव घेतले.

जाहिरात
Read Time: 2 mins

सौरभ वाघमारे, सोलापूर: भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याला अपहरण करुन मारहाण केल्याचा प्रकार सोलापूरमध्ये घडला आहे.  आमदार रोहित पवार यांच्या कार्यकर्त्याकडून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या शरणू हांडे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची गोपीचंद पडळकर यांनी भेट घेतली. यावेळी रोहित पवार यांच्या सांगण्यावरुन ही मारहाण झाल्याचा आरोप जखमी तरुणाने केला आहे.

गुरुवारी रात्री गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता शरणू हांडे याला अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांकडून अपहरण करुन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून हा मारहाणीचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. शरणू हांडे याला मारहाण केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी त्याची भेट घेतली. यावेळी मारहाण झालेल्या तरुणाने रोहित पवार यांचेही नाव घेतले.

Ajit Pawar News: 'ओ चौबे, मूर्खासारखं..', अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना सुनावलं

'मला गाडीत घातल्यानंतर रोहित पवार यांचा व्हिडिओ कॉल आला होता. रोहित पवार यांनी अमित सुरवसेची माफी मागायला लावली. मात्र मी त्यास नकार दिला. त्यानंतर रोहित पवार यांनी त्याला जास्त मस्ती आहे. तुम्ही बघून घ्या असं म्हणत फोन कट केला. त्यांच्या इशाऱ्यावरुनच मला मारहाण झाली. मारहाण करणाऱ्यांपैकी काही तरुण पुण्यातील असतील," असं शरणू हांडे याने सांगितले. 

"महाविकास आघाडीचे सरकार असताना माझ्या गाडीवर हल्ला झाला होता. हल्ला करणारा अमित सुरवसे हा शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड रोहित पवार आहे. माझ्या गाडीवर हल्ला करण्याआधीही रोहित पवार यांनी बैठक घेतली होती. या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा. शरणू हांडेचा पोलिसांमुळेच जीव वाचला, नाहीतर घातपात झाला असता. असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. तुमच्यात हिंमत असेल तर समोर येऊन लढा, मला कधी बारामतीमध्ये यायचं ते सांगा.." असे आव्हानही त्यांनी केले.

Ajit Pawar: पुण्यात आणखी 3 महानगरपालिका? DCM अजित पवारांची मोठी घोषणा