विशाल वाघमारे, सोलापूर: सोलापूरमध्ये महानगरपालिकेचे रुग्ण पळवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खासगी नर्सिंग होमला तात्पुरते टाळे ठोकण्यात आले आहेत तसेच महापालिकेतले रुग्ण पळवण्यात मदत करणाऱ्या 49 अशा सेविकांना नोटीसा देण्यात आले आहेत. या प्रकारने आरोग्य क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आशा सेविकांना कमिशन देऊन मनपा प्रसूतिगृहातील रुग्ण पळवण्याचा गोरख धंदा आरोग्य विभागाने उघड केला होता. या प्रकरणात सोलापुरात महानगरपालिकेचे रुग्ण पळणाऱ्या रुग्णालयावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. रुग्ण पळवणाऱ्या श्रेयश नर्सिंग होमला आरोग्य विभागाकडून तात्पुरत सील करण्यात आले आहे. तसेच महापालिकेतले रुग्ण पळवण्यात मदत करणाऱ्या 49 अशा सेविकांनाही नोटीसा देण्यात आल्या आहेत.
आशा सेविकांना कमिशन देऊन मनपा प्रसूतिगृहातील रुग्ण पळवण्याचा गोरख धंदा आरोग्य विभागाने उजेडात आणला होता. गेल्या वर्षभरापासून 259 अशा सेविकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून मनपा रुग्णालयातील गर्भवती रुग्णांना पळवण्याचा प्रकार चालला होता.
रुग्णांना पळवण्यासाठी श्रेयस नर्सिंग होमचे डॉ. सुमित सुरवसे यांच्याकडून आणण्यासाठी अशा सेविकांना पैसे भेटवस्तू जेवण नाश्ता अशा प्रकारचं अमिष देण्यात आले होते. याप्रकरणी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या पथकाने कारवाई केली. मनपा आरोग्य अधिकाऱ्यांनी श्रेयश नर्सिंग होमवर छापा टाकून 21 रजिस्टर जप्त केले आहेत. या संपूर्ण प्रकरणातमनपाच्या डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चौकशी होणार आहे.