Solapur To Goa flight service : सोलापूरकरांसाठी चांगली बातमी समोर आली आहे. अखेर सोलापूर विमानतळावरुन थेट गोव्याला जाणं शक्य होणार आहे. आजपासून सोलापूर-गोवा विमानसेवा सुरू झाली आहे. प्रदीर्घ काळानंतर अखेर सोलापूरकरांना विमानाने गोवा गाठता येणार आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
होडगी येथील सोलापूर विमानतळावरून आज सोलापूर - गोवा आजपासून होणार सेवा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. सोलापूर गोवा प्रवास करणाऱ्या पहिल्या पाच प्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बोर्डिंग पास देण्यात आलं आहे.
नक्की वाचा - WFH Fraud : इन्स्टाग्रामवरील जाहिरातीला भुलली, 'वर्क फ्रॉम होम'च्या बहाण्याने महिलेला 10 लाखांचा गंडा
सोलापूर ते गोवा विमान, कसा असेल प्रवास..
सोमवार व शुक्रवार : गोवा येथून सकाळी 7.20 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल. त्यानंतर 8.30 वाजता सोलापूर विमानतळावर विमान लँड होईल. सकाळी 8.50 ला सोलापूरहून विमान गोव्यासाठी उड्डाण घेईल. 10.15 वाजता गोवा विमानतळावर विमान उतरणार आहे. सोमवार तसेच शुक्रवारसाठी असे वेळापत्रक असणार आहे.
शनिवार व रविवार : गोवा येथून सायंकाळी 4.05 वाजता सोलापूरसाठी विमान उड्डाण घेईल. 5.10 वाजता सोलापुरात विमान उतरणार आहे. त्यानंतर सायंकाळी 5.35 वाजता सोलापुरातून गोव्यासाठी विमान उड्डाण घेईल. 6.50 ला गोव्यात विमान लँड होईल
सोलापूर ते गोवा या 409 किलोमीटर अंतरासाठी विमान तिकीटाचा दर 3,500 ते 5,000 दरम्यान असेल, अशी माहिती आहे.