मंगेश जोशी, जळगाव
जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील गुढे गावावर शोककळा पसरली आहे. भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावत असताना, गुढे येथील जवान स्वप्निल सुभाष पाटील यांना वीरमरण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमेवरील फ्लड लाईटची दुरुस्ती करत असताना त्यांना विजेचा धक्का बसला. या दुर्दैवी घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.
स्वप्निल पाटील यांच्या निधनाची बातमी कळताच गुढे गावावर शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या भूमिपुत्राच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
(नक्की वाचा - Bhaskar Jadhav: 'भिडा, नडा, एकटा बास', ब्राम्हण समाज अन् भास्कर जाधवांचं स्टेटस चर्चेत का?)
वीर जवानाचे पार्थिव पश्चिम बंगालमधून आज विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आणले जाणार आहे. त्यानंतर, सैन्य दलाच्या विशेष वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी गुढे येथे आणले जाईल. तिथेच त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.