Abu Azmi on Aurangzeb : विधानपरिषद अध्यक्ष अबु आझमी यांना औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य भोवलं असून त्यांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपेपर्यंत निलंबन करण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आज विधानसभेत चंद्रकांत पाटील यांनी हा प्रस्ताव मांडला. काही दिवसांपूर्वी विधानसभेच्या परिसरात समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी औरंगजेबाची भलामण करणारं वक्तव्य केलं होतं. त्यावर राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. राजकीय नेत्यांकडूनही त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात होती.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले होते अबु आझमी?
औरंगजेबाबाबत चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाने अनेक मंदिरांची उभारणी केली आहे. औरंगजेबाच्या एका सेनापतीला पंडिताच्या मुलीशी लग्न करायचं होतं. तेव्हा त्यांनी त्या सेनापतीला हत्तीच्या दोन्ही पायामध्ये बांधून ठार मारलं. शेवटी त्या पंडितांने तिथेच त्याच्यासाठी मशीद बांधली, बनारसमध्ये ही मशीद बांधण्यात आली आहे.
सध्या चुकीचा इतिहास दाखवला जात आहे. औरंगजेबाला मी एक क्रूर शासक मानत नाही. औरंगजेबाने आपल्या राजवटीदरम्यान एक रुपयाही घेतला नाही. औरंगजेबाच्या फौजेत हिंदू कमांडर होते. त्यावेळचा संघर्ष हिंदू-मुस्लिमांमधील नव्हता. त्याच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत पसरली होती. देशात सोन्याचा धूर निघत होता. त्यानंतर इंग्रज भारतात आले.