मुंबई:
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत मोठे संकेत दिले आहे. त्यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद देणार का? याबाबत एकनाथ शिंदेंना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, त्यावरही बैठकीत चर्चा होईल. म्हणजेच एकनाथ शिंदेंनी श्रीकांत शिंदेंच्या उपमुख्यमंत्रिपदाची शक्यता नाकारलेली नाही.
नक्की वाचा - श्रीकांत शिंदे महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री? एकनाथ शिंदेंचे दरेगावातून सूचक संदेश
एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर श्रीकांत शिंदे यांनाही प्रश्न विचारण्यात आला आहे. या चर्चा त्यांनी फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, तुम्हीच या सगळ्या गोष्टींची चर्चा करता. मी उपमुख्यमंत्रिपदाचा विचार केलेला नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे.