'किती दिवस बाहेर राहणार, अखेर...'; तिकीट कापल्यामुळे अज्ञातवासात गेलेले वनगा अखेर घरी परतले

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने कुणालाही न सांगता घरातून निघून गेलेले आमदार श्रीनिवास वनगा (MLA Srinivas Vanga) अखेर अज्ञातवासातून घरी परतले आहेत. 

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने कुणालाही न सांगता घरातून निघून गेलेले आमदार श्रीनिवास वनगा (MLA Srinivas Vanga) अखेर अज्ञातवासातून घरी परतले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या एकाही आमदाराला डावलणार नाही असे एकनाथ शिंदे यांनीच जाहीर केले होते. परंतु षडयंत्र रचून माझं तिकीट कापण्यात आलं. गेली पाच वर्षे मतदारसंघात प्रामाणिक काम केल्यानंतरही तिकीट नाकारण्यात आलं. मात्र रागाच्या भरात लांब गेलो होतो. मात्र माझ्या बाहेर जाण्यामुळे संपूर्ण कुटुंब डिस्टर्ब झालं होतं, असं म्हणत त्यांनी अज्ञातवासात जाण्याबद्दल खेद व्यक्त केला. 

शिंदे गटाकडून उमेदवारी न मिळाल्याने श्रीनिवास वनगा यांनी असंतोष व्यक्त केला होता. माध्यमांशी बोलताना त्यांनी तिकीट कापल्याचा विरोध व्यक्त केला होता. त्यानंतर ते वनगा नॉटरिचेबल झाले होते. अखेर आज ते वनगा घरी परतले आहेत. घडलेल्या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'किती दिवस बाहेर राहणार,अखेर घरी येण्याचं ठरवलं. जगात खूप काही करण्यासारखं आहे, पद असेल नसेल तरीही काम करीत राहणार. यानंतर कुटुंब आणि कार्यकर्त्यांसाठी अधिक वेळ देऊन विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल याबाबत आशा नाही. परंतु दिल्यास स्वीकारेन. यावेळच्या निवडणुकीत महायुतीचे काम करणार आहे. वनगा कुटुंबाने सुरुवातीला भाजपमध्ये त्यानंतर नंतर शिवसेनेत काम केले हिंदुत्वाला जागणारे कुटुंब असल्याचे म्हणत श्रीनिवास वनगा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Advertisement

नक्की वाचा - Prakash Ambedkar Hospitalized : प्रकाश आंबेडकरांना हृदयविकाराचा झटका, आजच अँजिओग्राफी होणार

जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांना त्यांच्या मर्जीतील उमेदवार हवा होता. त्यामुळे त्यांनी माझ्या विरोधात कार्यकर्त्यांना भडकावले. अशा प्रकारे खोटं काम करणाऱ्या विरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच कारवाई करतील. मी भावनेच्या भरात बोललो होतो. दरम्यानच्या काळात शंभुराजे देसाई यांच्या सोबत बोलणं झालं. त्यांना मी शिवसेनेसोबत राहीन असं आश्वासन दिलं आहे, अशा शब्दात वनगा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

Advertisement