9 days ago

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने माफी मागणार नसल्याचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन व्यक्त केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर काय कायदेशीर कारवाई करणार याकडे सर्वांचच लक्ष लागलं आहे. कुणाल कामराने एकनाथ शिंदेवर केलेल्या गाण्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकनाथ शिंदे गटाकडून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं. 

Mar 25, 2025 22:59 (IST)

पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाला 10 कोटींचा निधी मंजूर

कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक पन्हाळा किल्ल्यावरील शिवस्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नगरविकास विभागाच्या माध्यमातून 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. 

विधानभवनात आज झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील  आमदारांची आणि लाखो शिवप्रेमींची ही मागणी मान्य करत शिवस्मारकाचा कामासाठी तत्काळ या निधीला मंजुरी दिली. याबाबतीतला शासन निर्णय तत्काळ काढण्यात येऊन तो या आमदारांना सुपूर्द करण्यात आला.

Mar 25, 2025 19:31 (IST)

Konkan Railway News: कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, दीड तास खोळंबा

खेडजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत

जवळपास दीड तास वाहतूक झाली होती विस्कळीत

मुंबईकडे जाणारी मांडोवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून

 तर चंदीगड ला जाणारी गोवा संपर्कक्रांती एक्सप्रेस अंजणी स्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती

दीड तासानंतर वाहतूक पूर्वपदावर

Mar 25, 2025 17:40 (IST)

Maharashtra Rain: राज्यात अवकाळीचा फटका! कोल्हापूर, पाटणमध्ये मुसळधार पाऊस

 कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस 

 गरमीन हैराण असलेल्या नागरिकांना थोडाफार दिलासा 

अचानक आलेल्या पावसामूळ नागरिकांची तारांबळ

Mar 25, 2025 14:53 (IST)

Live Update : विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांनी बिनविरोध निवड

विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांनी बिनविरोध निवड

Advertisement
Mar 25, 2025 14:39 (IST)

LIVE Updates: प्रशांत कोरटकरला दणका, 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टाने दणका दिला आहे. त्याला 28 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यावेळी काही शिवप्रेमींनी त्याच्यावर चप्पल फेकून मारण्याचाही प्रयत्न केला. 

Mar 25, 2025 14:25 (IST)

Live Update : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी 

Advertisement
Mar 25, 2025 14:22 (IST)

Live Update : आदित्य ठाकरेंचा गुन्हा लपविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केला - अ‍ॅड निलेश ओझा

आदित्य ठाकरेंचा गुन्हा लपविण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केला - अ‍ॅड निलेश ओझा, दिशाच्या वडिलांचे वकील

Mar 25, 2025 13:40 (IST)

Live Update : दिशा सालियनचे वडील मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

Live Update : दिशा सालियनचे वडील मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला 

दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी अॅडव्होकेट निलेश ओझा यांच्यामार्फत पुन्हा एकदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या संदर्भात अॅडव्होकेट निलेश ओझा यांनी मालवणी पोलीस स्थानकात जाऊन पुरावे देण्यासंदर्भात विनवणी देखील केली होती. संदर्भात चर्चा करण्यासाठी दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन आणि आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत असल्याची प्राथमिक माहिती

Advertisement
Mar 25, 2025 11:56 (IST)

Live Update : प्रशांत कोरटकरविरोधात शिवप्रेमी आक्रमक, चपला घेऊन शिपप्रेमी पोलीस ठाण्याबाहेर

प्रशांत कोरटकरला थोड्यात वेळात कोर्टात हजर करणार, जुना राजवाडा येथे शिवप्रेमींची मोठी गर्दी

Mar 25, 2025 11:10 (IST)

Live Update : पुणे पोलीस 7 कोटी 76 लाख किंमतीचे ड्रग्स करणार नष्ट

पुणे पोलिसांकडून 788 किलो ड्रग्स केले जाणार नष्ट 

एम डी, गांजा, कोकेन, एल एस डी, हेरॉईन या सारखे अमली पदार्थांची उद्या चाचणी, पंचनामा केल्यानंतर विल्हेवाट केली जाणार आहे. पुणे पोलीस मुख्यालयात या आधी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक, प्रदूषण कंट्रोल बोर्ड, रासायनिक विश्लेषण कंपनीचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. ललित पाटील कारवाईतील ड्रग्स वगळता इतर सर्व ड्रग्सची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. 

Mar 25, 2025 09:45 (IST)

Live Update : महादेव मुंडे प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा बदलले

महादेव मुंडे प्रकरणातील तपास अधिकारी पुन्हा बदलले

सहाय्यक पोलीस अधीक्षक कमलेश मीना करणार महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास 

आधी या प्रकरणाचा तपास अंबाजोगाईचे पोलीस उपाधीक्षक अनिल चोरमले यांच्याकडे होता 

सोमवारी या प्रकरणाचा तपास गेवराईचे पोलीस उपाधीक्षक एन बी राजगुरू यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता 

मात्र काही तासातच हा तपास आता केजचे सहाय्यक पोलीस आधीक्षक कमलेश मीना यांच्याकडे देण्यात आलाय

दरम्यान गेल्या महिन्याभरात या प्रकरणाचे तपासी अधिकारी तीन वेळेला बदलण्यात आले आहेत

Mar 25, 2025 08:04 (IST)

Live Update : नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी तीन आरोपींना अटक

नागपूर हिंसाचारात ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची संख्या 113 वर पोहोचली आहे.. यामध्ये 12 अल्पवयींनांचा समावेश आहे. मोहम्मद शारिक रजा अब्दुल शहीद, मोमीन मोहम्मद फिरोज खान आणि शोयब बेग मोहम्मद बेग पटेल अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.

या तीनही आरोपींना न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या 36 आरोपींची पोलीस कोठडी सोमवारी संपली आता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी कारागृहात झाली आहे..

Mar 25, 2025 08:04 (IST)

Live Update : खोक्याला पोलिसांकडून शाही बडदास्त?

खोक्याला पोलिसांकडून शाही बडदास्त?

बीडच्या कारागृहाबाहेर खोक्या उर्फ सतिश भोसले बिनधास्त मोबाईलवर बोलतानाचा व्हिडीओ ?

खोक्यासाठी थेट कारागृहात डब्बा?

जेलच्या आवारात कोणतीही परवानगी न घेता कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांशी त्याची मुक्त भेट होत असल्याचा दावा

न्यायालयीन कोठडीत असलेल्या कुख्यात आरोपींसाठी पोलिसांची ही ‘शाही व्यवस्था’ नक्की कशासाठी आणि कोणाच्या आदेशावर सुरू आहे? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.