Akola News : सावत्र बापाने घेतला 9 वर्षीय मुलाचा जीव; संपत्तीच्या वादातून हत्या झाल्याचा संशय

Akola News : दर्शन 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अकोट शहरांमधील राजस्थान चौकातून बेपत्ता झाल होता. 24 तास उलटूनही दर्शन घरी न आल्याने अकोटच्या पोलीस ठाण्यात दर्शनच्या आईने तक्रार दिली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश शिरसाट, अकोला 

Akola News : सावत्र बापाने मुलाची हत्या केल्याची घटना अकोल्यात घडली आहे. अकोटच्या राजस्थान चौकातून बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय दर्शन पळसकर या मुलाची सावत्र वडिलांकडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार पोलिसांच्या शोध मोहिमेत समोर आला आहे. दर्शन आईला सांगून घराबाहेर खेळायला गेला होता. मात्र घराबाहेर गेलेला दर्शन घरी परतलाच नाही. या हत्येप्रकरणी पोलिसांना आरोपी वडील आकाश कान्हेरकर आणि त्याचा मित्र गौरव गायगोले याला अटक केली आहे.  

(नक्की वाचा-  Ahilyanagar News : महिलांना आमिष देऊन ढाबा, बारमध्ये नाचवायचा; भाजप पदाधिकाऱ्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार)

मिळालेल्या माहितीनुसार, दर्शन 2 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अकोट शहरांमधील राजस्थान चौकातून बेपत्ता झाल होता. 24 तास उलटूनही दर्शन घरी न आल्याने अकोटच्या पोलीस ठाण्यात दर्शनच्या आईने तक्रार दिली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी शोधमोहिम सुरु केली. रात्रभर शोधमोहिमेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दर्शनची हत्या झाल्याचं समोर आलं. अकोट आणि अमरावतीच्या बॉर्डरवर असलेल्या चिंचोणा शेत शिवारातील गोमुखजवळ पोत्यात बांधलेल्या अवस्थेत दर्शनचा मृतदेह आढळला. 

दर्शनची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा अधिक तपास सुरु केला. त्यावेळी सीसीटीव्हीमध्ये सावत्र बाप आकाश कान्हेरकर दर्शनला त्याच्या मित्राच्या साथीने मोटरसायकलीने घेऊन जात असल्याचे दिसून आले. यानंतर पोलिसांनी आकाश कान्हेरकर आणि गौरव गायगोले या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं. त्यावेळी दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. 

(नक्की वाचा- Pratap Sarnaik: परिवहन मंत्र्यांनी Rapido बुक केली, राईड येताच रंगेहाथ पकडले)

मात्र दर्शनची हत्या कशासाठी करण्यात आली याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.  दरम्यान संपत्तीच्या वादावरूनच ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. अकोट पोलिसांनी दोघांनाही अटक करून गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article