
Pratap Sarnaik: राज्य सरकारच्या माध्यमातून बाईक टॅक्सी धोरण जाहीर करण्यात आले आहे. मात्र अद्याप पर्यंत कुठल्याही कंपनीला बाईक टॅक्स चालवण्या संदर्भात अधिकृत परवानगी देण्यात आलेली नाही. त्यानंतरही काही कंपन्यांच्या माध्यमातून बाईक टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. याबाबतच्या अनेक तक्रारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत सरनाईक यांनी आज (बुधवार, 2 जुलै) केलेल्या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
Pratap Sarnaik News: परिवहन मंत्र्यांनी माणुसकी जपली! रॅपिडोला दणका पण बाईक चालकाला पैसे दिले
सरनाईकांनी केला रियालिटी चेक
प्रताप सरनाईक यांनी या तक्रारीनंतर स्वतः रियालिटी चेक करण्याचे ठरवले. नाव बदलून त्यांनी 'रॅपिडो अॅप'च्या माध्यमातून रॅपिडो बाईक बुक केली. मंत्रालयाबाहेर प्रताप सरनाईक यांनी त्यांचे सहकारी गाडीची वाट बघत होती. गाडी आल्यानंतर ज्या कंपनीच्या ॲपच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते यावर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले.
(नक्की वाचा: OLA, Uber : ओला, उबेरचं भाडं दुप्पट होणार, सरकारनं दिली परवानगी! वाचा काय आहेत नियम?)
मात्र यावेळी प्रताप सरनाईक यांनी संबंधित दुचाकी चालकावर कारवाई करणे टाळले. या ऐवजी सरनाईक यांनी त्या बाईकच्या चालकाला यांनी भाडे म्हणून 500 रुपये देऊ केले. तसेच "तुझ्यासारख्या गोरगरिबावर गुन्हा दाखल करून आम्हाला काहीच साध्य होणार नाही. तथापि, या मागे लपलेल्या बड्या धेंडाना शासन झाले पाहिजे! हाच आमचा हेतू आहे." असे सरनाईक यांनी सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world