अजित पवारांनंतर आता 'दादांची सावली'; राष्ट्रवादीच्या पुनरुत्थानासाठी नरेश अरोरांचा नवा मास्टरप्लॅन?

NCP Dadanchi Savli Campaign: या प्लॅननुसार, सुनेत्रा पवार यांची प्रतिमा जनमानसात एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून निर्माण केली जाणार आहे. 

जाहिरात
Read Time: 3 mins
Dadanchi Savli Campaign: नरेश अरोरा यांनी 'दादांची सावली' ही संकल्पना मांडली आहे.
मुंबई:

NCP Dadanchi Savli Campaign: माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणि पवार कुटुंबामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे पक्षाच्या विलीनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला असतानाच, दुसरीकडे अजित पवारांचा राजकीय वारसा आणि त्यांची प्रतिमा जपण्यासाठी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला यश मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारे राजकीय रणनीतीकार नरेश अरोरा आता एका नवीन मोहिमेवर काम करत आहेत. या मोहिमेचे नाव आहे दादांची सावली. या विशेष प्लॅनद्वारे सुनेत्रा पवार यांना राज्याच्या राजकारणात अजित दादांचा चेहरा म्हणून समोर आणण्याची तयारी सुरू झाली असून, नुकतीच पुणे सर्किट हाऊसमध्ये या संदर्भात एक महत्त्वाची बैठक पार पडली.

काय आहे दादांची सावली प्लॅन?

अजित पवारांच्या पश्चात पक्षाची विस्कळीत झालेली घडी पुन्हा बसवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी नरेश अरोरा यांनी 'दादांची सावली' ही संकल्पना मांडली आहे. या प्लॅननुसार, सुनेत्रा पवार यांची प्रतिमा जनमानसात एक खंबीर महिला नेतृत्व म्हणून निर्माण केली जाणार आहे. 

अजित पवारांनी सुरू केलेली कामे आणि त्यांचा जनसंपर्क सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पुढे नेला जाईल. यासाठी संपूर्ण राज्यभरात सुनेत्रा पवार यांचे दौरे आयोजित केले जाणार असून, विशेषतः महिला मतदारांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. आगामी 2029 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महिलांना दिलेले 30 टक्के आरक्षण आणि लाडकी बहीण योजनेचा प्रभाव कायम ठेवण्यासाठी महिला मेळाव्यांचे मोठे जाळे विणले जाणार आहे.

Advertisement

( नक्की वाचा : NCP Merger News: विलीनीकरणाला पूर्णविराम! शशिकांत शिंदेंनी राष्ट्रवादीच्या गोटात टाकला बॉम्ब )
 

नरेश अरोरा आणि सुनेत्रा पवार यांची भेट

अजित पवार यांच्या निधनानंतर डिझाईन बॉक्स या कंपनीचे भवितव्य काय असणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. प्रफुल्ल पटेल यांनी या कंत्राटाबाबतचा चेंडू सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात टाकला होता. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुणे सर्किट हाऊसमध्ये नरेश अरोरा यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांची भेट घेतली. 

तब्बल 45 मिनिटे चाललेल्या या बैठकीत अरोरा यांनी एक सविस्तर प्रेझेंटेशन दिले. यामध्ये अजित दादांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कशी भरून काढता येईल आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कसा पुढे नेता येईल, याचा आराखडा सादर करण्यात आला.

Advertisement

( नक्की वाचा : Ajit Pawar :अजित पवारांना कुणाच्या धमक्या होत्या? शशिकांत शिंदेंच्या खळबळजनक गौप्यस्फोटावर तटकरेंचं उत्तर )

कोण आहेत नरेश अरोरा?

नरेश अरोरा हे डिझाईन बॉक्स या प्रसिद्ध राजकीय रणनीती आखणाऱ्या कंपनीचे प्रमुख आहेत. राजकीय ब्रँडिंग, मेसेज मॅनेजमेंट आणि नेत्यांचा इमेज मेकओव्हर करण्यात त्यांचा मोठा लौकिक आहे. अजित पवार यांनी स्वतःच्या आणि पक्षाच्या प्रतिमेसाठी अरोरा यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. 

लोकसभा निवडणुकीतील पिछाडीनंतर राष्ट्रवादीला संजीवनी देण्यासाठी अरोरा यांनीच गुलाबी कॅम्पेनिंग ही थीम डिझाईन केली होती. अजित पवार यांचे गुलाबी जॅकेट आणि लाडकी बहीण योजनेचा आक्रमक प्रचार ही अरोरा यांच्याच रणनीतीचा भाग होती. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आणण्यात त्यांच्या रणनीतीचा मोठा वाटा मानला जातो. आता तेच अरोरा सुनेत्रा पवारांच्या राजकीय प्रवासाला नवी दिशा देण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Advertisement
Topics mentioned in this article