Street tea stall viral video: चहा म्हणजे भारतीयांच्या आवडीचे एनर्जी ड्रिंक.. चहा आवडत नाही अशी व्यक्ती भारतात क्वचितच सापडते. वेळ, कार्यक्रम कोणताही असो, चहाला नेहमीच पहिली पसंती मिळते. घरापासून ते कार्यालयापर्यंत, चहा एक अविभाज्य भाग आहे. कदाचित यामुळेच गावांपासून ते शहरांपर्यंत, तुम्हाला रस्त्याच्या कडेला चहाचे स्टॉल्स आणि छोटी दुकाने नेहमी ग्राहकांनी गजबजलेली दिसतील. मात्र रस्त्याकडेला असलेल्या टपरीवर चहा पिताना अनेकदा घाणीचे साम्राज्य अन् अस्वच्छता आढळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्ही बाहेर चहा पिताना दहा वेळा विचार कराल.
टपरीवर चहा पिताय? 'हा' व्हिडिओ पाहा..
सोशल मीडियावर अनेक चहा विक्रेत्यांचे व्हिडिओ व्हायरल असतात. दुकानदारांच्या चहा बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती व्हिडिओंमध्ये दाखवले जातात. मात्र सध्या अशा एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे जो पाहून तुम्हीही डोके धराल. या व्हिडिओमधील चहा विक्रेता माश्यांनी भरलेल्या साखरेचा वापर करून चहा बनवताना दिसत आहे, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये, तुम्हाला दिसेल की चहा विक्रेता आधीच डझनभर माश्यांनी वेढलेल्या भांड्यात ठेवलेल्या साखरेचा वापर करून चहा बनवत आहे. तो जराही संकोच न करता, माश्यांनी भरलेली साखर उचलतो आणि चहाच्या ग्लासात टाकतो. आजूबाजूचे लोक याकडे जराही विचलित झालेले दिसत नाहीत, किंवा हा निष्काळजीपणा थांबवण्याचा प्रयत्नही करत नाहीत. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एक चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडिओ @Murti_Nain नावाच्या अकाऊंटवरून ट्विटरवर (पूर्वीचे ट्विटर) शेअर करण्यात आला होता. लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी हा आरोग्यास मोठा धोका असल्याचे म्हटले आहे तर काही जणांनीना खाद्यपदार्थ आणि पेये हाताळताना विशेष स्वच्छता राखण्याचा सल्ला देत आहेत. थोडक्यात बाहेर चहा पिताना आपल्यालाही सुरक्षेबाबत जागरुक राहणे गरजेचे आहे.
नक्की वाचा >> Pune News: काल वाढदिवस साजरा केला अन् आज आयुष्याचा शेवट झाला! मंचरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना