जाहिरात

Viral Video: सर्वात बुद्धीमान पक्षी..पण कारचा मोठा शत्रू! पार्क केलेल्या गाड्यांचा काही वेळातच करतो खुळखुळा

आम्ही तुम्हाला अशा पक्षाबाबत माहिती सांगणार आहोत,जो कारचा शत्रू म्हणून ओळखला जातो.कारण हा पक्षी गाडीवर येताच तो त्या वाहनाचे अनेक महत्त्वाच्या पार्ट्सचा खुळखुळा करून ठेवतो.

Viral Video: सर्वात बुद्धीमान पक्षी..पण कारचा मोठा शत्रू! पार्क केलेल्या गाड्यांचा काही वेळातच करतो खुळखुळा
Alpine Parrot Viral Video

Kea Bird Damaging Cars: तुम्ही आजपर्यंत अनेक पक्षांबाबत ऐकलं असेल.काही माणसांसोबत खूप लवकर फ्रेंडली होतात.तर काही त्यांच्या आवाजाने इरिटेड होतात.पण आम्ही तुम्हाला अशा पक्षाबाबत माहिती सांगणार आहोत,जो कारचा शत्रू म्हणून ओळखला जातो.कारण हा पक्षी गाडीवर येताच तो त्या वाहनाचे अनेक महत्त्वाच्या पार्ट्सचा खुळखुळा करून ठेवतो.न्यूझीलंडची केआ (Kea) चिमणी असं या पक्षाचं नाव आहे.पोपटासारखी दिसणारी ही चिमणी जगातील सर्वात बुद्धीमान पक्षांपैकी एक समजली जाते. पण या पक्षाचा एक खोडसाळपणा असा आहे, जो अनेकांचं नुकसान करू शकतं.

कारचं नुकसान का करते?

घाटमाथ्यावर अनेकदा लोक जेव्हा त्यांच्या कारने फिरायला जातात, तेव्हा ही केआ चिमणी या गाड्यांचे पार्ट्स उघडे करते. जर तुम्ही न्यूझीलंडच्या अल्पाईन परिसरात असेल, तर तुम्हाला या पक्षापासून खूपच सावध राहण्याची आवश्यकता आहे.कारण ही चिमणी पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या कारवर चोचीने हल्ला करते.तसच कारवर लावलेले रबर,विंडो सील,वायपर,एंटीना,हेडलाईट रबर,तसच टायरलाही खेचून बाहेर काढते.याच कारणामुळे लोक या चिमणीला कारचा मोठा शत्रू मानतात.

नक्की वाचा >> Maharashtra Rain : पाच-सहा दिवस वाट बघा..सलग 9 दिवस महाराष्ट्रात बरसणार मुसळधार पाऊस, IMD चा मोठा अलर्ट

केआ चिमणीबाबत माहिती

  • ही चिणी डोंगर भागात वावरते.
  • केआ पक्षाला खूप बुद्धीमान पक्षी समजलं जातं.
  • हा पक्षी 50 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं म्हणतात.
  • मोठं आवाज करणारे हे पक्षी वेगवेगळ्या जातीचे असतात.

नक्की वाचा >> Pune News: काल वाढदिवस साजरा केला अन् आज आयुष्याचा शेवट झाला! मंचरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

न्यूझीलंड सरकारने केआ पक्षाचं रक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. जर या पक्षाला कोणी मारलं तर त्याच्यावर कायदेशीर करवाई केली जाते.पर्यटकांनी त्यांच्या गाड्या सुरक्षीत ठिकाणी पार्क करण्याच्या सूचना दिल्या जातात.तसच या पक्षापासून लोकांना दूर राहण्यासाठीही सांगितलं जातं.

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com