- १२ वीमध्ये इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतर उमेश गणपत यांनी दूध विक्रीत वडिलांना मदत केली होती
- त्यांनी जिद्दीने महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून १२ वी पूर्ण करून पुढे पुणे विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले
- २०१२ आणि २०१३ मध्ये यूपीएससी परीक्षेत अपयश आल्यानंतर २०१४ मध्ये तिसऱ्या प्रयत्नात ते यशस्वी झाले
IPS Success Story: नशिबापेक्षा कतृत्वावर विश्वास ठेवला की यशाचे शिखर गाठता येते. हे उमेश गणपत यांनी सिद्ध केले आहे. 12 वीत नापास झाल्यानंतर अभ्यासाची ओढ सुटलेल्या एका तरुणाने देशातील सर्वात कठीण मानली जाणारी 'यूपीएससी' परीक्षा उत्तीर्ण करून आयपीएस (IPS) पदापर्यंत मजल मारली आहे. त्र्यंबकेश्वरमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. शालेय परीक्षेत नापास होणे म्हणजे आयुष्याचा शेवट नव्हे, हे आयपीएस उमेश गणपत यांच्या यशोगाथेवरून स्पष्ट होते. 12 वी नापास झाल्यानंतर दूध विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या उमेश यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) यश मिळवून प्रशासकीय सेवेत प्रवेश केला आहे.
उमेश गणपत यांचे वडील दूध विकण्याचे काम करायचे. शालेय शिक्षणात फारसे रस नसलेले उमेश 12 वीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात नापास झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून वडिलांना दूधविक्रीत मदत करण्यास सुरुवात केली. मात्र, जिद्दीने त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात (YCMOU) प्रवेश घेतला. 2005 मध्ये 12 वी पूर्ण केली. पुढे पुणे विद्यापीठातून त्यांनी BA, BEd आणि MA पूर्ण केले. त्यांन आभ्यासाठी ओढ लागली. पुढे काही तरी करून दाखवायचे अशी जिद्द त्यांनी मनाशी बाळगली.
उच्च शिक्षणांनतर उमेश यांनी दिल्ली गाठली आणि यूपीएससीचा अभ्यास सुरू केला.मेहनत करून त्यांनी 2012 आणि 2013 मध्ये परिक्षा दिली. पण दोन्ही प्रयत्नांत त्यांना अपयश आले. मात्र खचून न जाता त्यांनी हार मानली नाही. अखेर 2014 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात त्यांनी 704 रँक मिळवून आयपीएस पदाला गवसणी घातली. त्यांच्या या यशाने त्यांचे कुटुंबीय ही सुखावले. लेकाने करून दाखवल्याची भावना त्यांच्या मनात होती. कोणी विचार ही केला नसले की 12 वी ला नापास झालेला मुलगा पुढे आयपीएस अधिकारी होईल. पण उमेश यांनी हा तर्क खोडून काढत आयपीएस पदाला गवसणी घातली.
उमेश गणपत यांचे प्राथमिक शिक्षण गावातच झाले. 12 वीच्या निकालानंतर शैक्षणिक खंड पडला होता. मात्र त्यांनी मुक्त विद्यापीठातून शिक्षण सुरू ठेवून 2005 मध्ये 12 वीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर पुणे विद्यापीठातून उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी आपले लक्ष यूपीएससीकडे वळवले. दिल्लीत राहून त्यांनी कठोर परिश्रम घेतले. 2012 आणि 2013 मधील अपयशानंतर त्यांनी आपल्या चुका सुधारल्या. 2014 च्या परीक्षेत त्यांनी देशात 704 वा क्रमांक मिळवला. प्रतिकूल परिस्थितीतही डगमगून न जाता सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते, असा संदेश उमेश गणपत आपल्या कार्यातून देत आहेत. त्यांची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दिशादर्शक ठरली आहे.