जाहिरात

Shocking news: विधवा महिलेवर सलग 12 तास अत्याचार! एक- दोन नाही तर 'इतक्या' जणांनी तोडले लचके

या प्रकरणी तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडितेची सुरुवातीला पोलिसांनी दखल घेतली नाही.

Shocking news: विधवा महिलेवर सलग 12 तास अत्याचार! एक- दोन नाही तर 'इतक्या' जणांनी तोडले लचके
  • उत्तरप्रदेशातील पटहेरवा परिसरात विधवा महिला कामगारावर वीटभट्टी मालक आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केला
  • पीडितेवर सलग बारा तास अत्याचार करण्यात आले, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उद्भवला आहे
  • गुन्हा नोंदवताना पोलिसांनी फक्त छेडछाडीचा गुन्हा दाखल केला आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

एक धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही दिवसापूर्वीच पतीचं निधन झालेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ती ज्या वीटभट्टीवर काम करत होती. त्याच वीटभट्टीच्या मालकाची तिच्यावर वाईट नजर होती. शेवटी त्याने डाव साधत त्याच्या मित्रांसह या महिलेवर अत्याचार केले. त्या पेक्षा धक्कादायक बाब म्हणजे या नराधमांनी सलग 12 तासा या महिलेचे शोषण केले. तिथून सुटका करून घेतल्यानंतर महिलेने पोलिस स्थानकात धाव घेतली. त्यानंतर हा सर्व प्रकार  समोर आला.  

ही घटना उत्तरप्रदेशातील पटहेरवा परिसरात घडली. इथं एका विधवा महिला कामगारावर वीटभट्टी मालकाने आपल्या मित्रांसह सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडितेने 12 तास अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे. असं असतानाही पोलिसांनी केवळ विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याने संताप व्यक्त होत आहे. शिवाय अत्याचार करणारे आरोपी ही फरार आहे. त्यांचा काहीच पत्ता पोलीसांना अद्याप लागलेला नाही. 

नक्की वाचा - Inspiring Story: कायद्याचे शिक्षण नाही, तरीही सर्वोच्च न्यायालयात जिंकली लढाई!, अथर्वच्या संघर्षाची कहाणी

पीडित महिला विजय कुशवाहा नावाच्या व्यक्तीच्या वीटभट्टीवर काम करत होती. काही महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. त्यामुळे ती एकटी होती. या एकटे पणाचा गैरफायदा घेण्याचा प्लॅन कुशवाहा याने बनवला होता. त्यात त्याच्या दोन मित्रांचाही सहभाग होता. 9 फेब्रुवारी रोजी रात्री विजय कुशवाहा याने दोन साथीदारांसह कारमधून या महिलेचे अपहरण केले. त्यानंतर  तिला पडरौना येथील एका खोलीत डांबून ठेवण्यात आले. तिथेच  सलग 12 तास तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हे तिघे ही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार करत राहीले. महिलेला हे अत्याचार सहन करण्या शिवाय पर्याय नव्हता. कशी तरी तिने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. 

नक्की वाचा - Bhandara News: ऐकावे ते नवलच!, पगारवाढ नाकारली म्हणून चक्क नेटवर्क टॉवरचे केबलच कापले

या प्रकरणी तक्रार करण्यासाठी गेलेल्या पीडितेची सुरुवातीला पोलिसांनी दखल घेतली नाही. आरोपीचे राजकीय लागेबांधे असल्याने पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप महिलेने केला आहे. बलात्कार झालेला असतानाही पोलिसांनी केवळ छेडछाडीचा गुन्हा नोंदवला आहे. सध्या मुख्य आरोपी फरार असून पोलीस तपास सुरू असल्याचे सांगत आहेत. 9 फेब्रुवारीच्या रात्री वीटभट्टी मालक विजय कुशवाहा याने पीडितेचे तिच्या राहत्या घरातून अपहरण केले होते. त्यानंतर तिला एका अज्ञात ठिकाणी नेऊन 12 तास डांबून ठेवत अत्याचार केले. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली, मात्र त्यात बलात्काराचे कलम लावण्यास टाळाटाळ केली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com