रेवती हिंगवे, पुणे:
Sunny Phulmali Success Story: जिद्द, चिकाटी क्षितिजापल्याड झेप घेण्याची इच्छाशक्ती असली की कोणतेही स्वप्न पूर्ण करता येते. अगदी गरिबाच्या झोपडीतूनही यशाचे शिखर गाठता येते. अशीच जिद्द अन् मेहनतीच्या जोरावर गावोगावी नंदीबैल घेऊन फिरणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलाने कुस्तीस्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.
पुण्यातील लोहगाव येथे झोपडीत राहणाऱ्या आणि वडील नंदी बैल घेऊन फिरण्याच्या मुलाने नुकतंच बहेरैन देशात येथे झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले आहे. सनी सुभाष फुलमाळी अस या १७ वर्षाच्या तरुणाच नाव असून त्याच्या या संघर्षाची कहाणी ही प्रेरणादायी आहे. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत लोहगावचा कुस्तीपटू सनी फुलमाळी याने कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले असून त्याच्या या कामगिरीने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
Pune Crime: शिक्षक बायको, संशयी नवरा अन् 'दृश्यम' स्टाईल खून, पुण्याला हादरवणारी मर्डर मिस्ट्री
सुभाष फुलमाळी हे मुळचे बीडचे राहणारे. 15 वर्षापूर्वी कुटुंबाला सोबत घेऊन ते पुण्यात आले. पुण्यातील लोहगाव येथे एका मोकळ्या जागेत त्यांनी त्यांची झोपडी टाकली. बायको तीन मूले असा त्यांचा परिवार या झोपडीत राहत होता. सुभाष हे नंदी बैल घेऊन लोकांच्या दारोदारी जाऊ लागले तर बायको सुई दोरा विकू लागली. दोघेही पती पत्नी कष्ट करुन उदरनिर्वाह करू लागले. सुभाषला कुस्तीची खूप आवड असून वडील पैलवान असल्याने सुभाष यांनी देखील अनेक ठिकाणी कुस्ती केली.
पण एखाद्याने उपकाराने आपल्या एक झोपडी रहायला दिलेली असताना आणि परिस्थिती हलकीची असताना तिन्ही मुलांना सुभाष हे त्याच पडीक जागेत कुस्तीचे धडे देऊ लागले. सनी हा तीन नंबरचा मुलगा असून लहानपणापासून तो दोन्ही भावांसोबत कुस्ती खेळू लागला. कुस्ती खेळात तरबेज असलेल्या सनीची कला ओळखून लोहगाव मधील रायबा तालीम मधील पैलवान सोमनाथ मोझे आणि पैलवान सदा राखपसरे यांनी सनीला कुस्तीचे धडे देण्यास सुरवात केली. आणि त्याला नंतर लोणीकंद येथील पैलवान संदीप आप्पा भोंडवे यांच्या जाणता राजा तालमीत पाठवले. सनीची कुस्ती पाहून संदीप भोंडवे यांनी त्याला दत्तक घेतलं आणि त्याला कुस्तीचे धडे दिले आणि बहेरेन येथे झालेल्या एशियन युथ कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं आहे.