जाहिरात

MHADA Houses : म्हाडाच्या घराच्या स्वप्नांचा चक्काचूर; कुटुंबाचे 37 लाख बुडाले, तुम्ही ही चूक करू नका!

पवईमध्ये म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणं कुटुंबाला महागात पडलं आहे. म्हाडाच्या घरापायी या कुटुंबाचे तब्बल ३७ लाख बुडाले. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

MHADA Houses : म्हाडाच्या घराच्या स्वप्नांचा चक्काचूर; कुटुंबाचे 37 लाख बुडाले, तुम्ही ही चूक करू नका!

Fraud while buying MHADA houses : म्हाडामुळे स्वप्नांचं घर मिळवणं सोपं झालं आहे. मुंबई किंवा मुंबईजवळील शहरांमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी घरं केवळ म्हाडामुळे घेणं शक्य झालं आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने नागरिक म्हाडाच्या घरासाठी अर्ज करतात. मात्र पवईमध्ये म्हाडाच्या घराचं स्वप्न पाहणं कुटुंबाला महागात पडलं आहे. म्हाडाच्या घरापायी या कुटुंबाचे तब्बल ३७ लाख बुडाले. या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या घराचं (Mumbai news Fraud in buying MHADA house in Sakinaka family lost 37 lakh) आमिष दाखवून रमेश नागफारे (६२) या व्यावसायिकाचे तब्बल ३७ लाख बुडाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, करुणाकर पुजारी, त्यांची पत्नी सुनीता पुजारी आणि सनी कांबळे या तिघांनी त्यांची फसवणूक केली. नागफासे आणि पुजारी हे दोन्ही कुटुंब एकाच परिसरात राहतात. पुजारी कुटुंब पवईतील लेक व्ह्यू-को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहतात. पुजारी यांनी नागफासे यांच्याशी मैत्री केली. नागफारे पवई-साकीनाका या भागात घराच्या शोधात असल्याचे लक्षात येताच त्यांनी डाव आखला. पुजारी दाम्पत्याने स्वस्त दरात म्हाडाची रुम स्वस्त दरात मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. नागफासे यांनी विश्वास ठेवून पुजारी दाम्पत्याला सुमारे ३७ लाख रुपये टप्प्याटप्प्यान दिले. यासाठी ते म्हाडाच्या पावत्याही देत होते. मात्र या पावत्या बनावटी असल्याचं समोर आलं. 

नक्की वाचा - Dadar News: सरकारी कर्मचारी महिलेशी वाद, ड्रायव्हरने कॉल गर्ल म्हणत तिचे बनावट अकाउंट ओपन केलं; दादरमधील संतापजनक घटना

तुम्ही ही चूक करू नका...

आरोपींनी नागफासे यांच्याकडून पैसे उकळले, मात्र प्रत्यक्षात काहीच दिलं नाही. उलटपक्षी ते कुटुंबाला ठार मारण्याची धमकीही देत असल्याचा आरोप नागफासे यांनी केला आहे. त्यामुळे म्हाडाचं घर घेताना कोणावरही विश्वास ठेऊ नये. त्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा म्हाडाच्या अधिकृत व्यक्तींशी संपर्क साधावा. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com