Sugar Price Hike: बाजारात साखरेची चव आता 'महाग' होणार आहे. कारण, तब्बल सात वर्षांनंतर केंद्र सरकार साखरेच्या किमान विक्री किंमतीत (MSP - Minimum Selling Price) वाढ करण्याची शक्यता आहे. ही वाढ ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखानदारांसाठी दिलासा आहे.
किती होणार महाग?
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, साखरेच्या MSP मध्ये सुमारे 23 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, सध्या फेब्रुवारी 2019 पासून 31 रुपये प्रति किलो स्थिर असलेली साखरेची MSP वाढून आता 38 रुपये प्रति किलो पर्यंत जाऊ शकते.उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि उसाच्या एफआरपी (Fair and Remunerative Price) मध्ये वाढ झाल्यामुळे साखर उद्योगाकडून सातत्याने MSP वाढवण्याची मागणी होत होती. अखेर, सरकार या मागणीवर सकारात्मक विचार करत आहे.
साखर कारखान्यांना काय फायदा?
MSP मध्ये वाढ झाल्यामुळे याचे थेट फायदे साखर कारखान्यांना मिळतील. कारखान्यांचा आर्थिक प्रवाह (Cash Flow) सुधारेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची देणी वेळेवर देण्यासाठी त्यांना आर्थिक बळ मिळेल.
( नक्की वाचा : Pune News : ऑपरेशनमध्ये भयंकर चूक! प्रसूतीनंतर पोटात टॉवेल, महिलेचा जीव गेला; पुण्यातील हॉस्पिटलला मोठा झटका )
राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्यांच्या महासंघाने (NFCSF) नुकत्याच जाहीर झालेल्या 'Sugar (Control) Order, 2025' च्या कलम 9 नुसार आणि उसाच्या एफआरपीमध्ये झालेल्या 4.42% वाढीनुसार MSP मध्ये सुधारणा करणे "न्यायी आणि तार्किक" असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांनी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून साखरेची MSP 41 रुपये प्रति किलो करण्याची मागणी केली होती.
इथेनॉलच्या दरातही वाढ होणार?
साखरेच्या MSP मध्ये वाढ करण्यासोबतच केंद्र सरकार इथेनॉलच्या खरेदी किंमतीत देखील वाढ करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने 2025-26 हंगामासाठी 1.5 दशलक्ष टन साखर निर्यातीला (Export) नुकतीच मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर इथेनॉलच्या दरात वाढ करण्याचा विचार सुरू आहे.इथेनॉलच्या किमतीत वाढ झाल्यास, इथेनॉल उद्योगाशी संबंधित कारखान्यांच्या उत्पादनात वाढ होईल. या वाढीव उत्पादनातून भारताच्या जैवइंधन (Biofuel) मिशनला मोठी मदत होणार आहे, ज्यामुळे देशाला पर्यावरणपूरक ऊर्जा पर्यायांकडे वाटचाल करणे शक्य होईल.
( नक्की वाचा : Dombivli News: एका बॅनरने पेटला डोंबिवलीत संघर्ष! 'गलिच्छ राजकारण' म्हणत शिंदेंच्या आमदाराने भाजपाला डिवचले )
शेतकऱ्यांना आधार आणि ग्राहकांवर परिणाम
साखरेच्या MSP मध्ये सात वर्षांनी होणारी ही वाढ साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक आधार ठरू शकते.
शेतकऱ्यांना फायदा: ऊसाची एफआरपी 2024-25 हंगामासाठी 340 रुपये प्रति क्विंटल करण्यात आली आहे, जी मागील वर्षापेक्षा 7.4% अधिक आहे. MSP वाढल्याने कारखान्यांना आर्थिक सुरक्षा मिळेल, ज्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर मिळतील.
ग्राहकांवर परिणाम: साखरेच्या MSP मध्ये वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारात साखरेच्या किंमतीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे, म्हणजेच ग्राहकांना साखर काहीशी महाग मिळू शकते. मात्र, हा बदल साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आ