Sugar Hike: ऐन सणासुदीत साखर महागली! सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; दर कशामुळे वाढले?

आगामी काही महिने दरवाढ कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला असून, या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Sugar Price Hike Maharashtra 2026: राज्यात साखरेच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असून, ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे. गेल्या १५ दिवसांत किरकोळ बाजारात साखर तब्बल ७ ते ८ रुपयांनी महागली असून सध्या साखरेचा दर प्रतिकिलो ५२ रुपयांवर पोहोचला आहे. महिनाभरात घाऊक बाजारात प्रति क्विंटल सुमारे सहाशे रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. पावसाची अनिश्चितता, उत्पादनातील घट आणि केंद्र सरकारने जाहीर केलेला कमी कोटा यामुळे बाजारात साखरेची तेजी कायम आहे.

ऐन सणासुदीत साखर महागली! 

​केंद्र सरकारने देशांतर्गत बाजारासाठी जुलै महिन्याचा साखरेचा कोटा कमी केल्यामुळे बाजारात पुरवठा मर्यादित झाला आहे. २०२५-२६ च्या गाळप हंगामात अपेक्षेपेक्षा कमी उत्पादन झाले असून कारखान्यांकडील शिल्लक साठाही घटला आहे. यंदा जून आणि जुलै महिन्यात ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने उसाची वाढ खुंटली आहे. परिणामी, आगामी गाळप हंगामात साखरेचे उत्पादन २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज कृषी तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

Advertisement

​दुसरीकडे, खाद्य उत्पादक आणि मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर आगाऊ खरेदी केल्यामुळे मागणी वाढली आहे. आता श्रावण, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी आणि आगामी लग्नसराईमुळे साखरेच्या मागणीत आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे आगामी काही महिने दरवाढ कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला असून, या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'; हवामान विभागाच अंदाज काय?

साखरेचे सध्याचे दर काय आहेत?

बारीक साखर (प्रतिक्विंटल)

  • घाऊक : ४५०० रुपये प्रतिक्विंटल
  • किरकोळ : ४७ रुपये प्रतिकिलो

मध्यम साखर

  • घाऊक : ४६०० रुपये प्रतिक्विंटल
  • किरकोळ : ४८ रुपये प्रतिकिलो

मोठी साखर

  • घाऊक : ४७०० रुपये प्रतिक्विंटल
  • किरकोळ : ५२ रुपये प्रतिकिलो

 School Bus Safety Rules: विद्यार्थी वाहतुकीला सुरक्षा कवच! सरकारची कडक नियमावली; चालकांवर काय होणार कारवाई?