जाहिरात

School Bus Safety Rules: विद्यार्थी वाहतुकीला सुरक्षा कवच! सरकारची कडक नियमावली; चालकांवर काय होणार कारवाई?

१६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.

School Bus Safety Rules: विद्यार्थी वाहतुकीला सुरक्षा कवच! सरकारची कडक नियमावली; चालकांवर काय होणार कारवाई?

यशपाल सोनकांबळे, पुणे:

Maharashtra School Bus and Van Safety Rules 2026:  राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देत महाराष्ट्र मोटार वाहन नियम, २०२६ अंतर्गत शालेय बस, व्हॅन आणि शैक्षणिक संस्थांच्या वाहनांच्या नियमांमध्ये मोठा फेरबदल केला आहे. १६ जुलै रोजी अधिसूचित करण्यात आलेल्या या नव्या नियमांमुळे विद्यार्थी वाहतूक आता अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक होणार आहे.

विशेष म्हणजे, शालेय वाहतुकीचे भाडे प्रथमच अधिकृत नियमावलीच्या कक्षेत आणण्यात आले असून, हे दर निश्चित करण्याचे सर्व अधिकार आता प्रादेशिक परिवहन प्राधिकरणांना (आरटीओ) देण्यात आले आहेत. यामुळे पालकांची आर्थिक लूट थांबण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! या जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट'; हवामान विभागाच अंदाज काय?

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रवासाला सुरक्षा कवच; काय आहेत नवे नियम? 

​नव्या नियमावलीनुसार, मुंबई वगळता इतर क्षेत्रांमधील स्कूल बस आणि व्हॅनच्या वापराची मर्यादा १५ वरून थेट २० वर्षे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक वाहनात सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, सीट बेल्ट, डिजिटल हजेरी प्रणाली, पॅनिक बटण आणि व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे.

या सर्व सुरक्षा उपकरणांमुळे पालकांना आता एका मोबाईल अॅपच्या माध्यमातून आपल्या पाल्याच्या प्रवासावर थेट लक्ष ठेवता येणार आहे. याशिवाय, वाहनांमधील सीसीटीव्ही फुटेज किमान ३० दिवस सुरक्षित ठेवणे आणि गरजेनुसार परिवहन, शिक्षण किंवा पोलिस विभागाला उपलब्ध करून देणे वाहनचालक व मालकांसाठी बंधनकारक असेल.​विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न केवळ वाहनापुरता मर्यादित न ठेवता चालकांच्या आणि मदतनिसांच्या (अटेंडंट) पार्श्वभूमीवरही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत.

प्रत्येक वाहनचालक व मदतनिसाची पोलिस पडताळणी (पुलिस व्हेरिफिकेशन) आणि वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. शारीरिक सक्षमता तपासणीविना कोणत्याही व्यक्तीला विद्यार्थ्यांच्या वाहतुकीत सामावून घेतले जाणार नाही. राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, खात्रीशीर आणि पालकांसाठी दिलासादायक ठरणार असून सर्व वाहतूक कंत्राटदारांना या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

(नक्की वाचा-  Pune News: लग्नासाठी वडिलांनी आधार कार्डमध्ये केला घोटाळा; मुलीच्या एका कॉलने खळबळ)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com