Who is Richest person in Pawar family : अजित पवारांच्या निधनानंतर रिकामी झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नामांकन दाखल केलं आहे. शरद पवार गटाने त्यांचा उमेदवार दिला नाही. यादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून मोठी बाब समोर आली आहे. पवार कुटुंबातील सर्वात श्रीमंत पवार कोण असा सवाल यावेळी उपस्थित होत आहे.
सुनेत्रा पवारांकडे किती आहे संपत्ती?
निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, सुप्रिया सुळे यांच्या जवळ १६७ कोटींची कौटुंबिक संपत्ती आहे. ही रक्कम शरद पवार यांच्या संपत्तीच्या तब्बल तीन पटीने जास्त आहे. शरद पवार यांच्याकडे ६१ कोटींची संपत्ती आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे १२२ कोटींची संपत्ती आहे. हे आकडे बारामती पोटनिवडणुकीच्या नामांकन प्रक्रियेदरम्यान समोर आले आहेत. यानुसार, शरद पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे पवार कुटुंबातील सर्वाधिक श्रीमंत आहेत. तर त्यांचे वडील आणि पक्षाचे प्रमुख शरद पवार या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत. निवडणुकीदरम्यान पवार कुटुंबातील संपत्तीवरुन चर्चा सुरू झाली आहे.
बारामतीची पोटनिवडणूक कधी आहे?
बारामती विधानसभा मतदारसंघासाठी २३ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे. तर मतमोजणी ४ मे रोजी असेल. पवार कुटुंबाचा किल्ला मानला जाणारा बारामती मतदारसंघ राज्यातील सर्वात प्रतिष्ठित राजकीय मतदारसंघांपैकी एक मानला जातो.