NCP News: "आम्ही पक्षासाठी कष्ट घेतले, यादीत नाव का नाही?", तटकरे- पटेलांची सुनेत्रा पवारांकडे नाराजी

सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांच्याकडून  निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत नाव नसल्याबद्दल विचारणा करण्यात आली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

रामराजे शिंदे, दिल्ली:

दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवरुन पक्षामध्ये मोठा वादंग पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे यांची नावे वगळल्याने जोरदार चर्चा रंगल्या होत्या. याबाबत स्पष्टीकरण देताना सुनेत्रा पवार यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे म्हटले होते. मात्र या संपूर्ण प्रकरणावरुन सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

सुनील तटकरे, पटेलांची सुनेत्रा पवारांकडे नाराजी 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीमधून नाव वगळल्याच्या वादाप्रकरणी प्रफुल पटेल आणि सुनिल तटकरेंनी सुनेत्रा पवार यांच्यासमोर नाराजी व्यक्त केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गुवाहाटीमध्ये सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये याबाबत चर्चा झाली. यावेळी तटकरे आणि पटेल यांच्याकडून  निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या यादीत नाव नसल्याबद्दल विचारणा करण्यात आली. 

Advertisement

“ही यादी कोणी बनवली?” आपल्याला न विचारता यादी बनविली गेली याबाबत, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांनी प्रश्न उपस्थित केले. 'आम्ही पक्ष वाढीसाठी कष्ट केले मात्र आमचीच नाव यादीत नाहीत, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांच्या समोरच नाराजी व्यक्त करण्यात आली. या नाराजीनंतर सुनेत्रा पवार यांनी मध्यरात्री उशिरा यादीत तांत्रिक चूक असल्याचं म्हणत ट्विट केले,  पण ट्विट करून देखील या दोन्ही नेत्यांची नाराजी कमी झाली नसल्याची सूत्रांची माहिती आहे. 

दरम्यान, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे २२ आमदार भाजपमधून लढणार आहेत, त्यांचा निर्णय झालेला आहे.. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यामध्ये एकनाथ शिंदेंचेही लोक आहेत, सर्व मिळून ४० जण आहेत. असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 

Goa and Konkan : गोवा-कोकणातील पर्यटक त्रस्त; फिरण्यावर मर्यादा, पुढील 3-4 दिवसात परिस्थिती चिघळण्याची भीती

Topics mentioned in this article