पुणे: सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर कधी कोण येईल याचा काही नेम नाही. एखाद्याच्या खोडसाळपणामुळेही अनेकदा भलत्याच व्यक्तीला टार्गेट केल्याचेही प्रकरणे सर्रास घडत असतात. असाच प्रकार पुण्यामधील मेट्रो प्रशासनासोबत घडला आहे. एका व्हायरल फोटोमुळे सध्या मेट्रो प्रशासन नेटकऱ्यांच्या टार्गेटवर आलं आहे. याबाबत आता पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामधील मेट्रो स्थानकावरील एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये SWARGET स्थानकाचा स्वर्गात असा मराठी अनुवाद करण्यात आला आहे. या चुकीमुळे मेट्रो प्रशासन सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहे. पुण्यामधून आता थेट स्वर्गात जाण्यासाठी मेट्रो मिळेल, असं म्हणत सोशल मीडियावर मेट्रो प्रशासनाची खिल्ली उडवली जात आहे.
सोशल मीडियावर सध्या हा फोटो जोरदार व्हायरल होत आहे. मात्र आता यावर पुणे मेट्रो प्रशासनाने स्पष्टीकरण दिले असून हा फोटो पुण्यातील कोणत्याही मेट्रो स्थानकामधील नसल्याचे स्पष्ट केले आहे. “हा वायरल होत असलेला फोटो, याचा पुणे मेट्रोशी काही सबंध नाही.” तसे हा व्हायरल फोटो एका जुन्या बीआरटी वरचा असल्याचेही सांगितले आहे.
कृपया लक्ष द्या, समाजमाध्यमांवर तसेच व्हॉट्सअपवर प्रसारित होणारा या फलकाचा फोटो पुणे मेट्रोशी संबंधित नाही. असं ट्वीट मेर्टो प्रशासनाने केले आहे. दरम्यान, एनडीटीव्हीच्या प्रतिनिधीने केलेल्या फॅक्ट चेकमध्येही हा फोटो पुणे मेट्रोमधील नसल्याचं स्पष्ट झालं आहे. स्वागरेट स्थानकाला जोडणारा रुट अद्याप सुरु झाला नाही तसेच हा फोटो 2016 मध्येही पोस्ट केल्याचे दिसत असल्याने हा संपूर्ण दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
(नक्की वाचा- Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण)