जाहिरात

Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण

Saif Ali Khan : सैफ अली खान प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Saif Ali khan Attack : ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचा सैफवर झालेल्या हल्ल्याशी संबंध नाही, पोलिसांचं स्पष्टीकरण

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली होती. मात्र त्याचा सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाशी संबंध नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे सैफ अली खान प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचं स्पष्ट झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सैफ अली खानवर हल्ला केलेल्या हल्लेखोराचा तपास करण्यासाठी पोलीस चोरीच्या घटनेतील अट्टल आरोपींचीही चौकशी करत आहे. ताब्यात घेतलेला संशयित आणि सीसीटीव्हीत दिसलेला आरोपी यांच्या साधर्म्य असल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. मात्र चौकशीअंती त्याचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं उघड झालं आहे. 

(नक्की वाचा - Saif Attacked: हल्ल्यामागे सैफच्याच घरातील व्यक्ती? 8 प्रश्न जे मुंबई पोलिसांना करतायत हैराण)

काय आहे प्रकरण? 

बुधवारी पहाटेच्या सुमारास घरात घुसलेल्या हल्लेखोराने सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, सैफ त्याला पकडण्यासाठी गेला तेव्हा आरोपीने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. आरोपीने सैफच्या पाठीत, हात, मान आणि पायावर असे सहावेळा वार केले होते. या हल्ल्यात करिना कपूर खान, दोन्ही मुलं तैमूर आणि जहांगीर सर्वजण सुरक्षित आहेत. 

काही बातम्यांनुसार, रात्री उशीरा साधारण 1 ते 2 वाजेदरम्यान हल्लेखोर पायऱ्यांनी सैफ करिनाच्या घरात आला. यानंतर हल्लेखोराने त्यांची मुलं तैमूर-जेहच्या खोलीत घुसला होता. हल्लेखोर जेव्हा तैमूर-जेहच्या खोलीत पोहोचला तेव्हा घरकाम करणाऱ्या फिलिप उर्फ लीमा तेथे उपस्थित होत्या. घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितलं की, आरोपीने तिला पकडलं. यानंतर ती आरडा-ओरडा करू लागली. आवाज ऐकून सैफ तातडीने मुलांना पाहण्यासाठी खोलीत पोहोचला. 

(नक्की वाचा - Saif Ali Khan Attacked: सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी पाहा Exclusive Video)

एक कोटींची मागणी

सैफला पाहताच अज्ञात व्यक्तीने त्यांच्याजवळी चाकू काढला. सैफने त्याला विचारलं, तुला काय हवंय? यावेळी आरोपीने पैशांची मागणी केली. सैफने विचारले, किती हवेत? आरोपीने यावर एक कोटींची मागणी केली. यादरम्यान दोन घरकाम करणाऱ्या महिला तेथे पोहोचल्या. आपण पकडले जाऊ शकतो हे हल्लेखोराच्या लक्षात आल्यानंतर त्याने सैफवर सुऱ्याने हल्ला केला. रात्री साधारण 2.30 दरम्यान हा सर्व प्रकार घडला. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com