Tadoba News: पर्यटकांसाठी महत्त्वाचं! 1 जुलैपासून ताडोबा जंगल सफारी बंद

कोअर भागात होणारे पर्यटन बंद करण्यात येणार आहे. 1 जुलै पासून ते 30 सप्टेंबरपर्यंत हा पावसाचा काळ असतो. त्यामुळे पर्यटन बंद ठेवले जाते.

जाहिरात
Read Time: 2 mins

चंद्रपूर: पर्यटकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.  पावसाळ्यामुळे १ जुलैपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. १ जुलैपासून तीन महिन्याकरीता हे पर्यटनस्थळ पर्यटकांसाठी बंद करण्यात येणार आहे. त्याचबरोबर बफर क्षेत्रात मात्र मान्सून पर्यटन सुरू ठेवले जाणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प वाघ व अन्य वन्यप्राण्यांच्या पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. दरवर्षी पावसाळ्यात तीन महिण्याकरीता कोअरझोनमधील पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. कोअर भागात होणारे पर्यटन बंद करण्यात येणार आहे. 1 जुलै पासून ते 30 सप्टेंबरपर्यंत हा पावसाचा काळ असतो. त्यामुळे पर्यटन बंद ठेवले जाते.

वन्यजीवांच्या प्रजनन काळात कुठलाही व्यत्यय येऊ नये शिवाय पावसामुळे अंतर्गत भागातील रस्त्यांनी पर्यटन वाहने जाण्यास अडचणी निर्माण होतात. परिणामी दुर्घटनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे कोअर झोनमधील क्षेत्र पर्यटनाकरीता बंद ठेवण्यात येते. गत काही वर्षांत ताडोबा वारी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.पावसाळ्यात रस्त्यांची पावसाळ्यात जैवविविधतेवरील दुष्परिणाम टाळण्यासाठी तसेच जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात.

ट्रेंडिंग बातमी -  Pune News: कोयत्याचा धाक, अल्पवयीन तरुणीवर अत्याचार, भल्या पहाटे वारी मार्गावर भयंकर कांड

मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. यंदा मान्सून लवकर आला आहे. पण आधीच सफारीचे ३० जूनपर्यंत बुकिंग झाले असल्याने नेहमीच्या १ जुलैपूर्वी पावसाळी सुट्टीचा विचार कठीण होता. तेव्हा आता व्याघ्रप्रकल्पातील कोअर क्षेत्रात पर्यटकांसाठी सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. मात्र बफर क्षेत्रात मान्सून पर्यटन सुरू ठेवले जाणार आहे.

Advertisement

'या' गावात ब्राह्मण पुजाऱ्यांना येण्यास मनाई', गावानं असं फर्मान का काढलं?