Shocking! महाराष्ट्राला 'या' महारोगाचा विळखा!11 हजार 91 गावांमध्ये High अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील किती गावे?

केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली असून, राज्यातील तब्बल ११ हजार ९१ गावे क्षयरोगाच्या ‘हाय रिस्क’ श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

TB Crisis in Maharashtra: महाराष्ट्रात वाढत्या तापमानासोबतच आता आरोग्य व्यवस्थेसमोर क्षयरोगाचे (टीबी) मोठे आव्हान उभे राहिले आहे. केंद्र सरकारच्या १०० दिवसांच्या विशेष मोहिमेत धक्कादायक आकडेवारी समोर आली असून, राज्यातील तब्बल ११ हजार ९१ गावे क्षयरोगाच्या ‘हाय रिस्क' श्रेणीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, मोहिमेच्या पहिल्या ३५ दिवसांतच ६ हजार १११ नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे.

Dombivli News: मैत्रीचा हात नाही; सैतानाचं जाळं! डोंबिवलीत मदतीसाठी गेलेल्या तरुणीचा नराधमाने केला घात

महाराष्ट्राला टीबीचा विळखा, ११ हजार गावांमध्ये अलर्ट

केंद्र सरकारने २०२५ पर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या मोहिमेत ‘एआय' (Artificial Intelligence) आधारित ‘व्हीएमटीबी' टूलचा वापर करण्यात आला. भौगोलिक स्थिती, कुपोषण, लसीकरण, आणि जीवनशैली यांसारख्या निकषांच्या आधारे गावे निवडण्यात आली आहेत. यात यवतमाळ (५३९ गावे) आणि अमरावती (५०४ गावे) या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक धोका वर्तवण्यात आला आहे.

Advertisement

​मोठ्या प्रमाणावर तपासणी मोहीम
राज्यातील सुमारे दीड कोटी लोकांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. वाढत्या धोक्याची दखल घेत प्रशासनाने १४ वर्षांवरील प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या गावांमध्ये कुपोषण आणि मधुमेहाचे प्रमाण अधिक आहे, तसेच जिथे तंबाखूचे सेवन मोठ्या प्रमाणावर होते, अशा ठिकाणी विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती गावे?

विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक ५३९ गावे धोक्यात आहेत, तर अमरावती जिल्ह्यात ५०४ गावे हाय रिस्कवर आहेत. नाशिक आणि रायगड जिल्ह्यात प्रत्येकी ४८८ गावे संकटात आहेत. नागपूर जिल्ह्यात ४८२, पुणे ४७९, चंद्रपूर ४६७, सातारा ४४२, गडचिरोली ४३३ आणि नांदेड जिल्ह्यात ४०४ गावे हाय रिस्क श्रेणीत आहेत.
​तसेच अहिल्यानगर जिल्ह्यात ४०१, रत्नागिरी ३८८, जळगाव ३८३, बुलढाणा ३६४, वर्धा ३५३, बीड ३४४, छत्रपती संभाजीनगर ३३९ आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३१० गावे धोक्यात आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सोलापूर २९१, अकोला २४९, जालना २४२, गोंदिया २३९, लातूर २३८, नंदुरबार २३८, पालघर २३१, भंडारा २२६, परभणी २१२, ठाणे २१२, वाशिम १९८, सिंधुदुर्ग १८९, धाराशिव १८५, सांगली १८४, हिंगोली १७८ आणि धुळे जिल्ह्यात १७१ गावे हाय रिस्कवर आहेत.

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंक कसा आहे? रोडचा फायदा काय? 'ही' आहेत वैशिष्ट्ये; A टू Z माहिती