Priyanka Chaturvedi : ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी स्वत:चाच फोटो पाहून का भडकल्या? 

नेमकं काय आहे प्रकरण? प्रियांका चतुर्वेदी का भडकल्या?

जाहिरात
Read Time: 1 min

Priyanka Chaturvedi's post goes viral : शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी हिरहिरीने महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे मुद्दे मांडत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर महिलांशी संबंधित अत्यंत गंभीर मुद्दा केंद्र सरकारच्या समोर उपस्थित केला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित अॅप्सच्या दुरुपयोगावर कडक पावलं उचलण्यात यावीत, असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. 

प्रियंका चतुर्वेदी या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. २५ जानेवारी रोजी त्यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो शेअर करीत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

नक्की वाचा - हिंदू अभिनेत्रीला भररस्त्यात विवस्त्र करण्याचा प्रयत्न, रेप आणि ठार मारण्याची धमकी

काय आहे प्रकरण? 

त्याचं झालं असं प्रियांका चतुर्वेदी यांचा फोटो एका पाकिस्तानी महिलेने स्वत:चा फोटो असल्याचं सांगत शेअर केला आहे. त्या महिलेचं नाव Syeda Mahnoor Zaidi आहे. फोटो शेअर करताना महिलेने लिहिलंय, माझं खरं वय काय असेल? हा फोटो पाहून प्रियांका चतुर्वेदी चांगल्याच संतापल्या. त्यांनी ही पोस्ट रिशेअर करीत म्हटलं,तुमचे फॉलोअर्स आणि एन्गेजमेंट वाढविण्यासाठी संमतीशिवाय माझा फोटो वापरत आहात. यावरुन तुमची आणि तुमच्या देशातील स्वत:चं महत्त्व टिकवून ठेवण्यासाठी चोरी करण्याची वृत्ती दिसते.