Thane Water Supply Cut: ठाणेकरांनो, पाणी भरुन ठेवा! शुक्रवारी 'या' भागात पाणी पुरवठा बंद

Thane Municipal Corporation News: जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Thane Water Supply Cut News : ठाणे महानगर पालिका क्षेत्रात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची अन् मोठी बातमी. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्यासाठी शटडाऊन घेण्यात येणार आहे. त्यामुळे, ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींचा काही भाग येथे शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. 

कोणत्या भागात पाणी पुरवठा राहणार बंद? (which areas will the water supply be cut off?

बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १. २ व ३ वर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्याकरीता गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद राहील. त्यामुळे, ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. २६ व ३१ चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये, तसेच, वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. २. नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा २४ तासासाठी पूर्णपणे बंद राहील.

Crime News : बहिणीच्या घरी गेला अन् Air Force सैनिकाने 24 व्या मजल्यावरुन मारली उडी!

दरम्यान, पालिकेकडून आरोग्याच्या दृष्टीनेही काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.  पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. या कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे. तसेच, पाणी गाळून व उकळून प्यावे, असे आवाहन ठाणे महापालिकेने नागरीकांना केले आहे.