Kalwa Hospital: 25 बेड, 32 गर्भवती भरती! प्रसुतीसाठी आलेल्या महिलेला थेट... कळवा रुग्णालयात धक्कादायक प्रकार

Thane news: गर्भवतींना ठाणे जिल्हा रुग्णालय (Thane Civil Hospital) किंवा मुंबईतील केईएम (KEM Hospital) रुग्णालयात पाठवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

रिझवान शेख, प्रतिनिधी:

Kalwa Hospital News: ठाणे महापालिकेच्या (Thane Municipal Corporation) छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, अर्थात कळवा रुग्णालय (Kalwa Hospital), येथील प्रसूतिगृहातील (Maternity Ward) परिस्थिती सध्या अक्षरशः कोंडवाड्यासारखी झाली आहे. उपचारांसाठी आलेल्या गरोदर मातांना प्रसूतीकळा होण्यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाच्या अव्यवस्थेच्या कळा सोसाव्या लागत आहेत, असे विदारक चित्र समोर आले आहे.

२५ खाटांवर ३२ महिला

कळवा रुग्णालयातील प्रसूतिगृहात फक्त २५ खाटांची सुविधा असताना, सध्या येथे ३२ महिलांवर उपचार सुरू आहेत. खाटांची क्षमता ओलांडल्यामुळे काही महिलांवर नाइलाजाने थंडगार फरशीवर झोपण्याची वेळ आली आहे. एवढेच नाही, तर प्रसूतीसाठी आणखी आठ महिला खाटांच्या प्रतीक्षेत असल्याची धक्कादायक माहिती आहे. जागेअभावी अनेक गर्भवतींना ठाणे जिल्हा रुग्णालय (Thane Civil Hospital) किंवा मुंबईतील केईएम (KEM Hospital) रुग्णालयात पाठवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढावली आहे.

गरोदर महिलेला सोसावा लागला मानसिक त्रास

रुग्णालय प्रशासनाच्या या अनागोंदीमुळे अलीकडेच ठाण्यातील एका गर्भवतीच्या कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. डिसुझावाडी आरोग्य केंद्रातून (Disuzawadi Health Center) या महिलेला कळवा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, कळवा रुग्णालयात पोहोचल्यावर त्यांना बेड फुल (Bed Full) असल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिला आधी सोनोग्राफी (Sonography) करून येण्यास सांगितले. सोनोग्राफी करून परत आल्यावर या महिलेला थेट ठाणे जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला. या वेळखाऊ आणि गोंधळामुळे गर्भवतीसह संपूर्ण कुटुंबाला नाहक मनस्ताप सहन करावा लागला.

Maharashtra Rain : पुढील आठवड्यातही धो-धो; मुंबई-पुण्यासह या जिल्ह्यांना पावसाचा इशारा 

वसई-विरारपर्यंतचे रुग्ण कळव्यात

या रुग्णालयावर आजूबाजूच्या मोठ्या भागाचा ताण आहे. कळवा रुग्णालयात दाखल होणाऱ्या बहुतांश महिला या केवळ ठाणे शहरातील नसून, त्या अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, भिवंडी आणि अगदी दूरवरच्या वसई, विरार, पालघर भागातून उपचारासाठी येतात, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

Advertisement

'प्रशासनाचे स्पष्टीकरण'

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी या गर्दीबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, अतिरिक्त दाखल झालेल्या महिलांसाठी जादा बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. रुग्णालयात झालेल्या प्रसूतींपैकी ६० टक्के महिलांचे सिझेरियन (Cesarean) करण्यात आले आहे, तर उर्वरित ४० टक्के महिलांची नॉर्मल डिलिव्हरी (Normal Delivery) झाली. सध्या सर्व माता आणि बाळांची प्रकृती चांगली असून, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम (Expert Team) सज्ज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महिला वॉर्ड फुल्ल, बेड वाढवण्याचे नियोजन

कळवा रुग्णालयातील महिलांचा विशेष वॉर्ड (Women's Special Ward) असून, याठिकाणी ७२ बेडची सुविधा आहे, मात्र तो विभागही फुल्ल असल्याची माहिती आहे. ज्या महिलांना बरे वाटत आहे, त्यांना जागा रिकामी करण्यासाठी शनिवारी (आज) घरी सोडण्यात आले आहे. सध्या कळवा रुग्णालय ५०० बेडचे आहे, पण येथे ५०४ रुग्ण उपचार घेत आहेत. याठिकाणी ओपीडीमध्ये (OPD) दररोज १८०० ते २२०० रुग्ण उपचारासाठी येतात. सध्या ६५ कोटी रुपये खर्चून येथील विभागांचे नूतनीकरण (Renovation) करण्यात येत आहे, तसेच भविष्यात येथील बेडची क्षमता आणखी ५०० ने वाढविण्याचे नियोजन आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.

Advertisement

NEET Student death : 40 मिनिटं Video कॉलवर बोलला, NEET च्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने वडिलांना धक्का!