Ravi Varma Honey Trap: पैशासाठी देशाशी गद्दारी! ठाणे हेरगिरी प्रकरणात ATSचा खळबळजनक खुलासा

रवींद्रला मदत करणाऱ्यांचा किंवा तो ज्यांच्या संपर्कात आहे त्याचा मागोवा काढला जात होता. मात्र पेहलगामच्या हल्यानंतर ATS ने त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले

जाहिरात
Read Time: 3 mins

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील कळवा येथून एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. रवी कुमार वर्मा (Pakistani Spy Ravi Varma) असे या आरोपीचे नाव आहे. रवी वर्माने पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्हची फेसबुक अकाऊंट असलेल्या पायल शर्माला संवेदनशील माहिती पुरवल्याचे समोर आले आहे. याचप्रकरणी आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 ठाणे हेरगिरी प्रकरणात रविंद्र वर्मा याने ही हेरगिरी जाणीव पूर्वकच केल्याचे ATS च्या तपासात समोर आले आहे. मूळात पेहलगामच्या दहशतवादी हल्याच्या काही दिवसापूर्वीच रवींद्रच्या या हेरगिरीची दहशतवाद विभागाला माहिती मिळाली होती. त्यानुसार ATS चं पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतं, रवींद्रला मदत करणाऱ्यांचा किंवा तो ज्यांच्या संपर्कात आहे त्याचा मागोवा काढला जात होता. मात्र पेहलगामच्या हल्यानंतर ATS ने त्याच्यावर लक्ष केंद्रीत केले
 
रवींद्र ज्या कंपनीत ज्युनिअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्या कंपनीला नेव्हीकडून कंत्राट देण्यात आले होते. नोव्हेंबर 2024 रोजी पायल शर्माची पहिल्यांदा फ्रेंड रिकवेस्ट फेसबुकला आली होती. दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संवाद सुरू असताना मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.  मात्र पायल ही हिंदु नसून मुस्लिम असल्याची माहिती रविंद्रला होती. मात्र तरीही रवींद्रने त्यावर प्रश्न उपस्थित केला नाही.

( नक्की वाचा : Vaishnavi Hagawane: 'वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत...' हगवणे कुटुंबीयांच्या वकिलाचा गंभीर आरोप! वाचा कोर्टात काय घडलं )

 कालांतराने प्रत्येक माहितीमागे पैसे मिळू लागल्यानंतर रवींद्रला त्याची चटक लागली होती. रविंद्रला हे पैसे त्याच्या खात्यावर विविध मार्गाने येत होते.  या खात्यांची माहितीही ATS कडून घेतली जात आहे. रविंद्रला भारतातूनही त्याला या हेरगिरीसाठी मदत झाल्याचा संशय  ATS ला आहे. त्या अनुशंगानेही तपास सुरू आहे.  कारण रविंद्रच्या खात्यात जमा झालेले पैसे कधी भारतातून तर कधी परदेशातून त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याचे आतापर्यंत  ATS च्या निदर्शनास आले आहे

आतापर्यंत 4 प्रकरणं हेरगिरीची समोर आली असली तरी कुरूलकर याच्यानंतर रविंद्र वर्माचं प्रकरण अत्यंत गंभीर असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. इतर प्रकरणाच्या तुलनेत रविंद्र हा अधिक धीट असून अनेक माहिती तो लपवत असल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. इतकच काय तर पाकिस्तानी एजंटला माहिती पाठवल्यानंतर बरीच माहिती त्याने जाणीवपूर्वक मोबाइलमधून डिलीटही मारल्याचे तपासात निदर्शनास आले आहे

Advertisement

 आपण गोपनीय माहिती देत आहोत याची रविंद्रला जाणीव होती. आतापर्यंतच्या तपासात जरी त्याला ब्लॅकमेल करून माहिती दिल्याचं तो किंवा त्याच्या घरातले म्हणत असले तरी त्याच्या आतापर्यंतच्या वर्तवणूकीवरून तसे वाटत नसल्याचे एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. पैशांच्या हव्यासापोटीच त्याने ही माहिती लिक केल्याच्या निकषापर्यंत ATS चे पोलिस पोहचले आहेत, आपण काय करतोय याची नक्कीच जाणीव रवीला होती म्हणूनच बहुताश मेसेज त्याने डिलीट मारले.

Akola Crime: कृषी अधिकाऱ्यांची मोठी कारवाई! लाखो रुपयांचे बोगस बियाणे जप्त

दरम्यान, रवी वर्माने युद्धनौका आणि पाणबुड्यांच्या माहिती व्यतिरिक्त शस्त्रसाठा, बॅकप प्लान, नेव्हीच्या गोडाऊनमधील शस्रसाठा मनुष्यबळ तैनात आणि इतर माहितीही लिक केल्याचा संशय  ATS ला आहे पाकिस्तानी एजंटला ही माहिती पाठवण्यासाठी एका स्वतंत्र अकाऊंटचा सोशल मिडियावरील वेगळ्या मार्गाचा वापर ही केल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisement