VIDEO : घसा कोरडा पडला अन् माकडाने चक्क एसटीच अडवली; पाण्यासाठी मुक्या जिवाचा 'हा' आर्त टाहो नक्की पहा

Thirsty monkey viral video: यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या खंडाळा घाटात बुधवारी दुपारी एका अशा घटनेचे साक्षीदार प्रवाशांनी भरलेली एसटी बस ठरली, जी पाहून कोणाचेही डोळे पाणावतील.

जाहिरात
Read Time: 2 mins
Thirsty monkey viral video: हा केवळ एका माकडाचा हट्ट नव्हता, तर...
यवतमाळ:

Thirsty monkey viral video: यवतमाळ जिल्ह्यातील पुसदच्या खंडाळा घाटात बुधवारी दुपारी एका अशा घटनेचे साक्षीदार प्रवाशांनी भरलेली एसटी बस ठरली, जी पाहून कोणाचेही डोळे पाणावतील. रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडलेल्या एका मुक्या जिवाने चक्क धावती बस अडवून पाण्यासाठी आर्त टाहो फोडला. हा केवळ एका माकडाचा हट्ट नव्हता, तर निसर्गाच्या भीषण संकटाने गांजलेल्या वन्यजीवांचा जगण्यासाठी सुरू असलेला संघर्ष होता.

तहानलेल्या माकडाचे धावत्या बससमोर 'आंदोलन'

दुपारची 3 वाजताची वेळ आणि उन्हाच्या तीव्र झळा अंगाची लाहीलाही करत असताना, धुळे-यवतमाळ ही एसटी बस वाशिमवरून पुसदकडे निघाली होती. खंडाळा घाटातील वळणावरून बस जात असताना अचानक एक माकड रस्त्याच्या मध्यभागी येऊन उभे राहिले. चालकाने प्रसंगावधान राखून बस थांबवली. सुरुवातीला माकडाला बाजूला करण्याचा प्रयत्न झाला, पण ते माकड तिथून हटायला तयार नव्हते. ते मदतीसाठी जणू काही बसला विनवणी करत होते.

Advertisement

प्रवाशांनी पाण्याची बाटली पुढे केली अन्...

बसमधील प्रवाशांच्या हे लक्षात आले की, हे माकड भुकेलेले नसून प्रचंड तहानलेले आहे. एका प्रवाशाने खिडकीतून पाण्याची बाटली पुढे केली. माकडाने ती बाटली हातात घेऊन घटाघटा पाणी पिण्यास सुरुवात केली. हे पाहून जंगलातील इतर माकडेही हळूहळू रस्त्यावर आली. ही माकडे पाण्यासाठी किती व्याकुळ झाली होती, हे त्यांच्या धडपडीतून स्पष्ट दिसत होते. प्रवाशांनीही संवेदनशीलता दाखवत आपल्या जवळील पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या या मुक्या जीवांना रिकाम्या केल्या.

( नक्की वाचा : कियान कपूरला पाहिलंत का? आई करिश्मा आणि बहीण समायरासोबत दिसला खास चार्म; वडिलांच्या 'त्या' आठवणी पुन्हा ताज्या )

वन विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह

या हृदयस्पर्शी घटनेचा व्हिडिओ बसमधील प्रवासी लता श्रीवास यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये टिपला असून, तो सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी वन विभागाकडून जंगलात कृत्रिम पाणवठे तयार केले जातात, असे दावे केले जातात. मात्र, भररस्त्यात येऊन माकडांना अशा प्रकारे पाण्यासाठी बस अडवावी लागत असेल, तर वन विभागाचे हे पाणवठे फक्त कागदावरच आहेत का, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

( नक्की वाचा : Monsoon 2026: पावसाच्या वाटेत 'व्हिलन'ची एन्ट्री! शेतकरी ते सर्वसामान्य सर्वांचीच चिंता वाढली, वाचा सर्व अपडेट )

वाढत्या उन्हाचा वन्यजीवांना मोठा फटका

विदर्भातील तापमान सध्या 40 अंशांच्या पुढे जात आहे. माणसांना उन्हाचा त्रास होतोच, पण जंगलातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत आटल्याने वन्यप्राण्यांचे हाल होत आहेत. खंडाळा घाटातील या घटनेने निसर्गप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. वन्यप्राणी पाण्यासाठी मानवी वस्तीकडे किंवा रस्त्याकडे वळत असल्यामुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जंगलात पाण्याची सोय करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

इथे पाहा संपूर्ण व्हिडिओ

Topics mentioned in this article