Malegaon News: टिपू सुलतानच्या मुद्यावर मालेगाव पेटले! शिवसेनेच्या इशाऱ्याला उपमहापौरांचं उत्तर, वाद चिघळणार?

Tipu Sultan Portrait Row in Malegaon Municipal Corporation: लेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने सध्या शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Tipu Sultan Portrait Row : समाज माध्यमांवरही या प्रकरणाचे दोन्ही बाजूने पडसाद उमटत आहेत.
मालेगाव:

निलेश वाघ, प्रतिनिधी

Tipu Sultan Portrait Row in Malegaon Municipal Corporation: मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याने सध्या शहरात मोठा वाद निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे मालेगावचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विषयावर हिंदुत्ववादी संघटना आणि शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले आहेत. समाज माध्यमांवरही या प्रकरणाचे दोन्ही बाजूने पडसाद उमटत असून प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे.

काय आहे प्रकरण?

मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शान ए हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला आहे. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. 

शिवसेनेच्या नगरसेवकांनी थेट महानगरपालिका आयुक्तांचे कार्यालय गाठून या प्रकाराचा निषेध नोंदवला. जोपर्यंत उपमहापौरांच्या दालनातून हा फोटो हटवला जात नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा पवित्रा या लोकप्रतिनिधींनी घेतला आहे.

( नक्की वाचा : Nashik News : मराठी बोलण्यास शिक्षकाचा विरोध, मनसे कार्यकर्त्यांनी क्लासमध्ये केला राडा, पाहा काय घडले, VIDEO )

शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन तो फोटो हटवावा.  फोटो काढला नाही, तर सध्या सुरू असलेली निदर्शने तीव्र आंदोलनात रूपांतरित होतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महापालिका वर्तुळात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

उपमहापौरांचे प्रत्युत्तर 

दुसरीकडे, उपमहापौर शान ए हिंद यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. टिपू सुलतान हे स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता, असे त्यांनी म्हटले आहे. भाजपाच्या एका खासदारानेही टिपू सुलतान यांचे योगदान मान्य केल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्र सरकारच्या एका अधिसूचनेचा संदर्भ देत त्यांनी विचारले की, विरोध करणारे हे लोक नेमके कोण आहेत? टिपू सुलतान यांची जयंती साजरी करण्याबाबतही त्यांनी ठाम मतं मांडली आहेत.

मालेगावात टिपू सुलतान यांच्या छायाचित्रावरून निर्माण झालेला हा वाद आता केवळ महापालिकेपुरता मर्यादित राहिला नसून त्याला राजकीय वळण मिळाले आहे. सत्ताधारी इस्लाम पार्टी या संवेदनशील मुद्द्यावर आता काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article