Todays Gold Silver Rate: चांदीच्या दरांचा नवा रेकॉर्ड! 1 किलो चांदीचा दर 2 लाखांच्या पार

ग्राहकांनी दागिने खरेदी करताना एका गोष्टीची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे की, वर दिलेले दर हे केवळ सोन्याचे पायाभूत दर आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Gold And Silver Rate Today: सराफ बाजारामध्ये सोन्याच्या किमतींनी नवीन उच्चांक गाठल्यामुळे दागिने खरेदी करणे आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागले आहे.  भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने ग्राहकांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. अशातच आता चांदीच्या दरानेही नवा रेकॉर्ड केला असून तब्बल दोन लाखांच्या वर किंमती गेल्या आहेत. दुसरीकडे सोन्याचेही दर चांगलेच वाढले आहेत. 

आजचा सोन्याचा दर किती? | Todays Gold Rate 

​सध्या नागपूरमध्ये 24 कॅरेट (९९.५ शुद्धता) सोन्याचा विक्री दर 1,32,900 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे, तर खरेदी दर 1,31,900 रुपये आहे. दागिन्यांसाठी सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या 22 कॅरेट (916 हॉलमार्क) सोन्याचा विक्री दर 1,23,600 रुपये आणि खरेदी दर 1,21,600 रुपये नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, 18 कॅरेट सोन्याचा विक्री दर1,03,700  रुपये असून खरेदी दर 1,01,700 रुपये आहे. कमी बजेट असलेल्या ग्राहकांसाठी उपलब्ध असलेल्या 14 कॅरेट सोन्याचा विक्री दर 86,400 रुपये तर खरेदी दर 84,400  रुपये इतका आहे.

Expensive Leaves: भारतात पिकणाऱ्या 'या' पानांना सोन्यासारखी किंमत! लाखोंचा मिळतोय भाव; असं काय आहे खास?

चांदीच्या दराचा नवा रेकॉर्ड| Todays Silver Rate 

​दुसरीकडे, चांदीच्या दरात मोठी उसळण पाहायला मिळत आहे. आज नागपुरात चांदीचा विक्री दर2,01,220 रुपये प्रति किलो या विक्रमी स्तरावर पोहोचला आहे. तसेच, प्लॅटिनमचे दर 60,000  रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर आहेत. ग्राहकांनी दागिने खरेदी करताना एका गोष्टीची विशेष नोंद घेणे आवश्यक आहे की, वर दिलेले दर हे केवळ सोन्याचे पायाभूत दर आहेत.

यावर किमान 13 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मजुरी  हॉलमार्किंग शुल्क आणि ३ टक्के जीएसटी (GST) अतिरिक्त आकारला जातो. लग्नसराईचा काळ असल्याने दरात चढ-उतार सुरूच असून खरेदीपूर्वी स्थानिक सराफा व्यापाऱ्यांकडे अंतिम दराची खातरजमा करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement

VIDEO: भिर्रssss! लक्ष्या- सचिन बैलजोडीने मारलं 'पुसेगाव हिंदकेसरी'चं मैदान; पाहा फायनलचा थरार

Topics mentioned in this article