Ladki Bahin Yojna: आदिवासींच्या विकासाचा निधी 'लाडक्या बहिणीं'साठी वळवला?  

बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

महायुती सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इतर योजनांना आणि विकासकामांना फटक बसत असल्याची ओरड आधीपासून होत होती. मात्र आता लाडकी बहीण योजनेसाठी इतर विभागाचा निधी वळवल्याची माहिती समोर आली आहे.यापूर्वी लाडकी बहीण योजनेसाठी मागासवर्गीयांचा निधी वळवल्याचं सांगितलं जात होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

आता आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी सरकारचा आदिवासी विकास खात्याच्या निधी वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींसाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी महिला आणि बालविकास खात्याकडे वळविण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.  मे महिन्याच्या हफ्त्यासाठी हा निधी महिला आणि बालकल्याण विभागात वळवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

नक्की वाचा - Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली मोठा फ्रॉड, शेकडो बनावट खात्यांचं गुजरात कनेक्शन उघड

लाडकी बहीण योजनेमुळे सरकारची दमछाक? 

बहिणींच्या बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करताना सरकारची दमछाक होऊ लागल्याने मागासवर्गीय आणि आदिवासींसाठी कल्याणकारी योजना आखणाऱ्या सामाजिक न्याय व आदिवासी विकास खात्याचा निधी वळवावा लागत असल्याचं समोर आलं आहे. आता आदिवासी विकास खात्यातून प्रत्येक महिन्याला असा निधी वळता केला जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

तुम्ही काही सोप्या पद्धतीनं लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झाला की नाही? हे चेक करु शकता

ऑनलाईन बँकिंग : ज्या बँकेच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात, त्या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जा. अथवा तुमच्या मोबाईलमध्ये त्याचे अ‍ॅप डाऊनलोड असेल तर तिथे जाऊन चेक करा. त्या ठिकाणी तुम्हाला हे पैसे जमा झाले की नाही हे निश्चित समजेल.

Advertisement

मोबाईल एसएमस : सध्या बहुतेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक हे बँकेच्या खात्याशी जोडलेले असतात. त्या मोबाईल क्रमांकावर तुमच्या खात्यामधील व्यवहाराचे सर्व अपडेट मिळतात. 'लाडकी बहीण योजनेचे' पैसे जमा झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून मोबाईलवर एसएमसच्या माध्यमातून चेक करता येईल.

फोन बँकिंग : बँकेच्या कस्टमर केअर क्रमांकावर फोन केल्यानंतरही तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये किती रक्कम जमा झाली त्याची माहिती मिळते. या माध्यमातूनही तुम्ही पैसे जमा झाले की नाही याची खात्री करु शकता.

Advertisement

प्रत्यक्ष बँकेत जा : बँकेमध्ये प्रत्यक्ष जाऊन तुम्ही तेथील अधिकाऱ्याशी संपर्क साधून किती रक्कम जमा झाली हे तपासू शकता.