Tuljapur Darshan : श्रावणात देवीच्या दर्शनाचा प्लान करताय? ऑगस्ट महिन्याचे 10 दिवस तुळजाभवानीचे दर्शन बंद

तुळजापूर मंदिर संस्थानातून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 

जाहिरात
Read Time: 1 min

Tuljapur Darshan : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी (Tuljapur Devi) देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचं मंदिर धाराशिवमधील तुळजापूर येथे आहे. श्रावण महिन्यात आवर्जुन देवदर्शनासाठी जात असतात. दरम्यान श्रावण महिन्यात तुम्ही देवीच्या दर्शनाचा प्लान करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुळजापूर मंदिरातील गाभाऱ्यातील दर्शन ऑगस्ट महिन्यातील दहा दिवस बंद राहणार आहे. तुळजापूर मंदिर संस्थानातून यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, जीर्णोद्धाराच्या कामासाठी तुळजाभवानीचं दर्शन दहा दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात भाविकांना मुखदर्शन घेता येणार आहे. तुळजाभवानीचे दर्शन 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धार होणार आहे. 

नक्की वाचा - Bhimashankar Jyotirling Darshan: श्रावण महिन्यात भीमाशंकराचे VIP दर्शन, अन्य भक्तांसाठी साध्या रांगेची व्यवस्था

यातही देवीच्या मुख्य गाभाऱ्यातील दर्शन बंद राहणार आहे. देवीच्या सिंहाच्या गाभाऱ्यातील जीर्णोद्धाराच्या कामासाठी दर्शन बंद असेल. पुरातत्व खात्याकडून जीर्णोद्धाराच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे एक ते दहा ऑगस्ट दरम्यान भाविकांना फक्त मुखदर्शन घेता येणार आहे.  देवीच्या इतर धार्मिक विधी सिंहासन पूजा ,अभिषेक पूजा नियमित सुरू राहणार असल्याची माहिती मंदिर संस्थानकडून देण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून देवीच्या मंदिराचे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. 

Advertisement
Topics mentioned in this article