Shardiya Navratri 2025 : तुळजापुरात नवरात्रौत्सवाची तयारी; देवीची मंचकी निद्रा ते पालखी मिरवणूक, या आहेत तारखा

tulja bhavani navratri utsav 2025 : 22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात देवीजींच्या रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापूजा, धारासन मर्दिनी पूजा यांसारख्या विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

shardiya navratri 2025 tuljapur : बाप्पाला निरोप देऊन दोन दिवस झाले असून आता नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या काही दिवसात (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला (Sharadiya Navratri 2025 Start Date end Date) सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात कोल्हापुरमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. राज्यभरातून देवीभक्त कोल्हापुरात देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. 14 सप्टेंबर रोजी देवीजीची मंचकी निद्रा सुरू होणार असून 22 सप्टेंबर रोजी पहाटे देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून दुपारी 12 वाजता मंदिरात विधिवत घटस्थापना केली जाईल.

आई तुळजाभवानीचा नवरात्र महोत्सव l tulja bhavani navratri utsav

22 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या काळात देवीजींच्या रथ अलंकार महापूजा, मुरली अलंकार महापूजा, धारासन मर्दिनी पूजा, शेष अलंकार महापूजा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाची भवानी तलवार अलंकार पूजा या देवीच्या विविध रूपातील पूजा केल्या जाणार आहेत. 1 ऑक्टोबर रोजी महानवमी असल्याने नगरच्या पलंग पालखीची भव्य मिरवणूक तुळजापुरात काढली जाणार आहे. तर 2 ऑक्टोबरला सार्वत्रिक सीमोल्लंघन करून विजयादशमी म्हणजे दसरा साजरा केला जाणार आहे. 6 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा तुळजापुरात साजरी केली जाणार असून या पौर्णिमेसाठी महाराष्ट्रासह परराज्यातूनही भाविक लाखोंच्या संख्येने तुळजापुरात दाखल होत असतात.

उत्सवाच्या या आहेत तारखा...

14 सप्टेंबर - देवीजीची मंचकी निद्रा 
22 सप्टेंबर - देवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना - विधिवत घटस्थापना
26 सप्टेंबर - रथालंकार पूजा
27 सप्टेंबर - मुरली अलंकार पूजा 
28 सप्टेंबर - शेषशाही पूजा
29 सप्टेंबर - भवानी तलवार पूजा
30 सप्टेंबर - महिषासूरमर्दिनी अलंकार पूजा
1 ऑक्टोबर - पलंग पालखीची भव्य मिरवणूक
2 ऑक्टोबर - सार्वत्रिक सीमोल्लंघन 
6 ऑक्टोबर -  कोजागिरी पौर्णिमा - लाखो भाविकांची तुळजापुरात हजेरी