Uday Samant News: 'त्या' कंपन्यांनी स्वतःहून निघून जावं...', भारत- पाक संघर्षानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांचा इशारा

अशा कंपन्या महाराष्ट्रात काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावे," असा थेट इशाराही उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

मुंबई: 'ज्या देशाने आपल्या विरोधात काम केले त्यांनी राज्यात येऊन पैसे कमावणार असाल तर हे चालणार नाही. अशा कंपन्या महाराष्ट्रात काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावं, असे सर्वात मोठे विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले आहे. भारत पाकिस्तानमधील तणावात तुर्कीने पाकला पाठिंबा दिल्यावरुन संताप व्यक्त करताना त्यांनी या कंपन्यांना थेट इशारा दिला आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

काय म्हणालेत उदय सामंत?

"गेल्या आठ दहा दिवसांपूर्वी भारत पाक देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पण आपल्या सैन्याने अतियश चांगले उत्तर दिले. ही परिस्थिती असताना तुर्की या देशाने मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिला. त्या देशातील कंपन्या आपल्या देशात येऊन पैसे कमवत होत्या. सेलीबी ही कंपनी सात देशातल्या विमानतळावर काम करून पैसे कमवत होते आणि आपल्या विरोधात त्याचा वापर करत होते, हे युद्धात समोर आले," असे उदय सामंत यावेळी म्हणाले. 

"मी शिवसैनिकांचे मनापासून धन्यवाद देतो, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर ही कंपनी पाच ते सात हजार कर्मचाऱ्यांबरोबर काम करून पैसे कमवत होती. अशा कंपनीने महाराष्ट्रात राहू नये अशी भूमिका आम्ही घेतली आणि आंदोलन केले. नुसतेच आंदोलन केले नाही तर त्यांना त्यांच्या देशात बंद करून  पळवून लावले. आमच्या राज्यात येऊन पैसे कमावणार असाल तर ही चालणार नाही. अशा कंपन्या महाराष्ट्रात काम करत असतील त्यांनी स्वतःहून निघून जावे," असा थेट इशाराही उदय सामंत यांनी यावेळी दिला आहे.

नक्की वाचा: तुरुंगातल्या आरोपीने सुचवले संजय राऊत यांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकाचे नाव

दरम्यान, ज्यांचे महाराष्ट्र आणि देशावर प्रेम नाही त्यांनी देश सोडून जाण्यास हरकत नाही. या युद्धामध्ये एक सिद्ध झालं की मेक इन इंडियाची शस्त्र वापरली गेली. त्यामुळे उद्योजकांना इथे अडचण नाही. जो पाकिस्तान स्वतःच्या देशात सुई तयार करत नाही त्यांनी आम्हाला शिकवायच नाही, असेही उदय सामंत यावेळी म्हणाले.

नक्की वाचा :पालिका निवडणुकीत 'मविआ राहणार का? मातोश्रीवरील भेटीनंतर हर्षवर्धन सपकाळ महत्त्वाचं बोलले!