शरद सातपुते, सांगली: पैलवान म्हटलं की समोर येतो त्यांचा व्यायाम, तगडा खुराक अन् शिस्तबद्ध आयुष्य. कुस्तीच्या स्पर्धा पाहिला की पैलवान व्हावं असं अनेकांना वाटते. मात्र पैलवानांचा खुराक अन् लाल मातीतील कसरत पाहून हे इतकं सोप्प नाही याची प्रचिती येते. याबाबतच शिवसेना शिंदे गटाचे वजनदार नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी एका खास किस्सा सांगितला आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते व डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून सिंदूर रक्तदान शिबिराचा आयोजन थेट जम्मू- काश्मीरमध्ये करण्यात आले आहे. या शिबिरासाठी सांगलीतून धर्मवीर एक्स्प्रेस विशेष रेल्वे रवाना झाली आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते यावेळी विशेष रेल्वेला झेंडा दाखवण्यात आला. यावेळी बोलताना उदय सामंत यांनी चंद्रहार पाटलांच्या शरीरयष्टीचे कौतुक केले.
"चंद्रहार पाटील यांच्यासारखी आपलीही तब्येत व्हावी असा मी विचार केला. खुराक पण चालू करावा म्हटले. पण, चंद्रहार पाटील/यांचा व्यायाम करत असलेला एक मी व्हिडिओ पाहिला आणि नंतर मला कळले की हे आपल्याला झेपणार नाही. आपली हाडे मोडून घेण्यापेक्षा तब्येत बनवायचा मी नादच सोडून दिला, असा मजेशीर किस्सा उदय सामंत यांनी सांगितला.
दरम्यान, सिंदूर रक्तदान शिबिरासाठी पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जिल्ह्यातील एक हजार युवक जाणार आहेत. 9 ऑगस्ट पासून पुढील वर्षभर देशातल्या विविध ठिकाणी असणाऱ्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सच्या कॅम्प मध्ये जाऊन सांगली जिल्ह्यातील युवक हे रक्तदान करणार आहेत. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या कर्तव्यासाठी प्राण देणाऱ्या सैनिकांच्या प्रति राबवण्यात येणारे पहिल्याच अभियान असल्याचं दावा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केला आहे. क्रांती दिन आणि रक्षाबंधनचे औचित्य साधून हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे चंद्रहार पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Dombivli : 65 अनधिकृत इमारतीच्या रहिवाशांना पूर्ण दिलासा, राज्य सरकारचा मोठा निर्णय