रत्नागिरी: राज्यात सध्या हिंदी भाषा सक्तीविरोधात तीव्र संताप आणि निषेध व्यक्त केला जात आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात मनसेकडून मुंबईमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रितपणे सहभागी होणार आहेत. अशातच आता शिवसेना नेते आणि भाषामंत्री उदय सामंत यांनी हिंदी सक्तीचा हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळातील असल्याचा आरोप केला आहे.
Sanjay Raut: 'हे बरं दिसत नाही...', राज ठाकरेंचा फोन अन् मातोश्रीवर चर्चा; कसं असेल मोर्चाचे नियोजन?
काय म्हणाले उदय सामंत?
हिंदी भाषेची कुठेही सक्ती केलेली नाही. हिंदी कुठेही अनिवार्य केलेलं नाही, हे मला पुन्हा एकदा स्पष्ट करायचे आहे. हिंदी सक्ती हा शब्द कुठून आला? डॉक्टर मार्शल साहेबांची जी समिती होती, फेब्रुवारी 22 ला याचा अहवाल सबमिट झाला. त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांनी हा शब्द स्वीकारला त्यांनी हिंदीची सक्ती केली. तीच लोक आज राज साहेबांची गर्दी जमणार आहे म्हणून तिथं सहभागी होत आहेत, असं उदय सामंत म्हणालेत.
याआधी उदय सामंत यांनी आदित्य ठाकरे यांचा एक व्हिडिओ उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला होता. यात आदित्य ठाकरे म्हणतायेत की मराठी सोबत जास्तीत जास्त भाषा विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे. तीन वर्षांपूर्वी तुमची ही भूमिका होती मग आज महानगरपालिका निवडणुका समोर असताना तुम्ही भूमिका बदलवत आहे, मराठीच्या मुद्द्याआडून राजकारण केलं जात आहे, असं उदय सामंत म्हणाले होते.