Ulhasnagar News: उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी पॅटर्न सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. महापालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांना प्रशासकीय कामकाजाचे धडे देण्यासाठी गुवाहाटी येथे पाच दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. या दौऱ्यासाठी महापालिकेच्या तिजोरीतून 65 लाखांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आली होती.
65 लाखांचा गुवाहाटी पॅटर्न
अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने 22 ते 26 जुलै दरम्यान विशेष प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी महापालिकेतील 76 नगरसेवकांनी गुवाहाटी गाठले. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणात विविध क्षेत्रातील तज्ञांनी नगरसेवकांना सभाशास्त्र, कायदेशीर प्रक्रिया, महासभेचे नियम कायदेशीर चौकट आणि कामकाजाची नियमावली आदींचे प्रशिक्षण दिले. महासभेत प्रभागातील नागरी समस्या आणि जनहिताचे प्रश्न आक्रमकपणे आणि प्रभावीपणे कसे मांडावेत या बाबतची माहिती देण्यात आली.
या गुवाहाटीच्या सहलीसाठी 76 नगरसेवकांचा सहभाग होता. अनेक नगरसेवकांनी कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईकांनाही सहल घडवून आणली. तर काही जणांचा या प्रशिक्षणाशी संबंध नसताना ते सुद्धा तिथे गेले होते. दरम्यान नगरसेवकांच्या या दौऱ्यानंतर नगरसेवकांच्या कार्यपद्धतीत आणि शहराच्या विकासात प्रत्यक्ष किती बदल दिसतो याकडे देखील उल्हासनगरवासियांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, 5 दिवसांच्या सखोल प्रशिक्षण वर्गात विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी या नगरसेवकांना सभाशास्त्र व कायदेशीर प्रक्रिया, महासभेचे नियम, कायदेशीर चौकट आणि कामकाजाची नियमावली आदीचे प्रशिक्षण दिले. तसेच या महासभेमध्ये प्रभागातील नागरी समस्या आणि जनहिताचे प्रश्न आक्रमकपणे व प्रभावीपणे कसे मांडावेत प्रशासकीय कारभारातील बारकावे कसे समजून घ्यावे व विषयानुसार अचूनक संचिका तयार करण्याचे तंत्र याबाबतची माहिती देण्यात आली.