जाहिरात

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धक्का! 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार, थेट मंत्र्यांकडे तक्रार,नेमक्या मागण्या काय?

तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना धक्का! 29 कर्मचाऱ्यांचा एल्गार, थेट मंत्र्यांकडे तक्रार,नेमक्या मागण्या काय?

IAS Tukaram Mundhe Controversy:  एफडीएच्या राज्यभरात धडक कारवायांमध्ये चर्चेत असलेले आयुक्त तुकाराम मुंढेंच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या राज्य अन्न व औषध प्रशासन प्रयोगशाळेत सर्व काही आलबेल नसल्याचं समोर आले आहे.  प्रयोगशाळेचे सहसंचालक तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीविरोधात प्रयोगशाळेतील तब्बल २९ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.

१५ जुलै रोजी पाठवण्यात आलेल्या या निवेदनात दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय, शनिवार-रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कामाचे आदेश, रिक्त पदांमुळे वाढलेला कामाचा ताण आणि त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या तक्रारपत्रावर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सह्याही आहेत. 

FDA News: 'फक्त खासगी आस्थापनांवर धाड...' FDAच्या धडक कारवायांवर प्रश्नचिन्ह; हायकोर्टाने दिले मोठे निर्देश

तुकाराम मुंढेंविरोधात एल्गार, 29 कर्मचाऱ्यांची तक्रार!

अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंनी प्रयोगशाळेत अचानक दोन शिफ्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला, मात्र त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नाही. रिक्त पदे मोठ्या प्रमाणावर असून विद्यमान कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. सकाळी ९ ते रात्री १२ अशा वाढीव वेळेत काम करावे लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही काम करण्याचे आदेश देण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

वाढलेल्या कामाच्या तुलनेत अतिरिक्त कर्मचारी, तांत्रिक सहाय्यक आणि संसाधने उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. अन्न, औषध आणि सौंदर्यप्रसाधनांच्या प्रलंबित नमुन्यांचा निपटारा करण्यासाठी घाई केली जात असून त्यामुळे विश्लेषणाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची भीतीही या कर्मचाऱ्यांना आहे तसेच भारतीय औषध संहिता (IP), ब्रिटिश (BP), USP अशा मानकांनुसार तपासणीसाठी पुरेसा वेळ आवश्यक असताना तो मिळत नसल्याचा दावाही या कर्मचाऱ्यांनी केला आहे.

काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? 

  • एका विश्लेषकाकडून दरमहा मर्यादित नमुने तपासले जाऊ शकतात; मात्र त्यापेक्षा जास्त नमुने तपासण्याचा दबाव असल्याचा आरोप.
  • दोन शिफ्ट सुरू करण्यापूर्वी प्रयोगशाळेची क्षमता, उपकरणे आणि मनुष्यबळ वाढविण्याची मागणी.
  • पूर्ववत कार्यालयीन वेळ लागू करावी आणि दोन शिफ्टचा निर्णय रद्द करावा, अशी प्रमुख मागणी.
  • अतिरिक्त कामासाठी योग्य भत्ते व सुविधा देण्याची मागणी.
  • सतत बदलणारे आदेश आणि कार्यालयीन वेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचा आरोप.
  • प्रयोगशाळेतील विश्लेषणाच्या गुणवत्तेशी तडजोड होऊ नये, यासाठी घाईगडबडीत नमुने निकाली काढू नयेत, अशी मागणी.

Megablock News: पुणे रेल्वे स्टेशनवर 9 तास मेगाब्लॉक! अनेक एक्सप्रेस रद्द, मार्गही बदलले, प्रवासाआधी 'हे' वाचा 

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com