Ulhasnagar News: तब्बल 6 तास ॲम्बुलन्सची वाट पाहिली, शेवटी रुग्णाने जीव सोडला; आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे!

मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी न दिल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमारकर, उल्हासनगर:  प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णाला खासगी रुग्णालयात हलवण्यासाठी तब्बल ६ तास सरकारी रुग्णवाहिका न मिळाल्यानं रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात घडली आहे. या घटनेने नागरिकांमधून संताप व्यक्त होत असून आरोग्यव्यवस्थेचे धिंदवडे निघाल्याचे चित्र दिसत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, उल्हासनगर 1 मधील हर्षवर्धन नगरमध्ये राहणारे राहुल इंडाते मध्यवर्ती रूग्णालयात उपचार घेत होते. त्यांची तब्येत खालावत असल्यानं मध्यवर्ती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांना खासगी रुग्णालयात शिफ्ट करण्याचा सल्ला नातेवाईकांना दिला. त्यासाठी त्यांनी दुपारी 2 वाजता नातेवाईकांनी सरकारी रुग्णवाहिकेसाठी फोन केला. पण रात्रीचे 8 वाजले, तरी सरकारी रुग्णवाहिका आली नाही.

Advertisement

अखेर रात्री 8 वाजता राहुल इंडाते यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर स्थानिक रहिवाशांनी एकत्र येत डॉक्टरांना जाब विचारला. राहुलच्या घरच्यांनी खासगी रुग्णवाहिकेने नेतो, असं म्हटल्यावर मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला परवानगी न दिल्याचा आरोप समाजसेवक शिवाजी रगडे यांनी केला आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्रातील आरोग्यव्यवस्थेचे पुन्हा एकदा धिंडवडे निघाले आहेत.

ट्रेंडिंग बातमी - Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे यांचे आगामी निवडणूकांत स्वबळाचे संकेत पण...

दुसरीकडे  जिल्ह्यातील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा मिळण्यासाठी रुग्णालये सुविधांसह अद्ययावत व स्वच्छ असली पाहिजेत.   टाकाऊ साहित्य वेळोवेळी निर्लेखित केले पाहिजे.  नेमून दिलेल्या वेळेत वैद्यकीय अधिकारी नियुक्तीच्या ठिकाणी उपस्थित असलेच पाहिजेत. रुग्णांना बाहेरिल अनावश्यक वैद्यकीय सेवा घेण्याचे संदर्भ टाळा, माता व नवजात शिशुच्या मृत्युचे टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन केले पाहिजे, असे निर्देश पूणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.