सिंधुदुर्ग: केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. एका कार्यक्रमासाठी नितीन गडकरी हे सिंधुदुर्गमध्ये दाखल झाले असून ते स्टेजवर बोलत असतानाच त्यांच्या सुरक्षेसाठी तनात असलेल्या कमांडोला चक्कर आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असताना हा प्रकार घडला. त्यानंतर त्या कमांडोला तात्काळ स्टेजवरुन उचलून बाजूला नेण्यात आले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.. देवगड येथे माजी आमदार आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप समारंभ आज पार पडत असून त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवगडमध्ये आले आहेत. . या कार्यक्रमावेळी आप्पासाहेब गोगटे यांच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या “स्मृतीगंध” या स्मरणिकेचे प्रकाशन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशित झाले.
(नक्की वाचा- Emotional story: आई वडील भारतात, लेकीला दुबईत फाशी, शेवटचा फोन कॉल अन्...)
यावेळी कार्यक्रमामध्ये नितीन गडकरी स्टेजवर बोलायला उभे राहताच धक्कादायक प्रकार घडला. नितीन गडकरी यांच्यामागे उभे असलेला कमांडो धाडकन स्टेजवर कोसळला, ज्यामुळे चांगलाच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले. वाढत्या उष्णतेचा त्रास झाल्याने कमांडोला चक्कर आल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्वरित चक्कर आलेलेल्या कमांडोवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.