Pandharpur News : मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टला पंढरपुरातून विरोध, संतवाणीचा दाखला देत स्थानिकांची अनोखी पोस्टरबाजी 

आज पंढरपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा आहे. त्यापूर्वी पंढरपुरात ठिकठिकाणी पोस्टरबाजी केल्याचं दिसून येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

संकेत कुलकर्णी, प्रतिनिधी

Pandharpur Corridor opposed : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या पंढरपूर कॉरिडॉरला स्थानिकांनी विरोध करण्यासाठी अनोखी पोस्टरबाजी केली आहे. विशेष म्हणजे विरोधाच्या पोस्टरबाजीमध्ये संताच्या अभंगाचे दाखले थेट फडणवीसांना उद्देशून देण्यात आले आहेत. या अनोख्या पोस्टरची चर्चा सध्या पंढरपुरात आहे. 

"वतन आमची मिराशी पंढरी... | विठोबाचे घरी नांदणूक ||" असा संत नामदेव महाराज यांच्या अभंगाच्या ओव्यांचा वापर करून फडणवीस यांचे स्वागत करण्यात आले आहे. काशी आणि उज्जैनच्या धर्तीवर पंढरपुरात कॉरिडॉरची निर्मिती करणे. हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. याच ड्रीम प्रोजेक्टमध्ये 600 पंढरपुरातील घरांचे भूसंपादन प्रस्तावित आहे. त्यामुळे नागरिकांनी भूसंपादनांना थेट विरोध दर्शवला आहे.

नक्की वाचा - Pune News : स्वारगेट आगारातर्फे 'ज्योतिर्लिंग दर्शन सहली'चं आयोजन, कधीपासून होणार सुरुवात?

मात्र तरीही 25 जुलैपासून पंढरपुरात शासन भूसंपादनाबाबत नागरिकांशी चर्चा करणार आहे. अशा परिस्थितीत आमचे वतन पंढरपूर आहे. आम्ही विठोबाच्या घरी नांदतो. अशा नामदेव महाराजांच्या अभंगाचा दाखला देऊन देवेंद्रजी आमचा तुमच्यावर विश्वास आहे, तुम्ही पंढरपूरची मूळ रचना आणि संस्कृती कायम ठेवाल. अशा आशयाचा मजकूर या पोस्टवर दर्शवण्यात आला आहे. सरते शेवटी फडणवीस यांचे स्वागतही करण्यात आले आहे. हे पोस्टर पंढरपुरात तीर्थक्षेत्र बचाव समितीकडून लावण्यात आले आहे. 

विठ्ठल मंदिर परिसरातील व्हीआयपी गेटजवळ हे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत नामदेव महाराज यांच्या 675 वा संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरपुरात येत आहे. याच फडणवीसांच्या दौऱ्याच्या निमित्ताने अनोख्या स्वागताच्या अनोख्या पोस्टरबाजीची चर्चा सर्वत्र रंगत आहे.